बुलडाणा: लॉकडाउनचा तिसरा टप्पा सुरू झाला असून बुलडाणा जिल्ह्यात जलसंपदा, समृद्धी महामार्गासह पुण्या, मुंबईतून स्वगृही जाण्यासाठी निघालेल्या व बुलडाणा जिल्ह्यात अडकलेल्या उत्तर प्रदेशातील ५०७ मजुरांना रेल्वेने उत्तरप्रदेशमध्ये पाठविण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने सुरू केले आहे.दरम्यान, प्रसंगी, सहा मे रोजी श्रमीक एक्सप्रेसद्वारे त्यांना अलाहाबादपर्यंत सोडले जाण्याची शक्यता जिल्हाधिकारी कार्यालयातील सुत्रांनी व्यक्त केली आहे. बुलडाणा जिल्ह्यात जवळपास ५४६ परराज्यातील मजूर अडकून पडले असून जिल्ह्यातील विविध कामामावर साडेचार हजारांच्या आसपास मजूर आहेत. यातील ज्या मजुरांनी स्वगृही जाण्यासाठीची इच्छा व्यक्त करून तशी आॅनलाईनची प्रक्रिया पुर्ण केली आहे, अशांपैकी पहिल्या टप्प्यात ५०७ मजुरांना उत्तरप्रदेशात पाठविण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले असून त्यासंदर्भातील प्रशासकीय कार्यवाहीही सध्या पुर्णत्वास गेली आहे. संदर्भीय विषयान्वये जिल्हाधिकारी कार्यालयात कामाचे नियोजन करण्यात आले असून काही नोडल अधिकाºयांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वकाही सुरळीत पारपडल्यास सहा मे रोजी बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर रेल्वे स्टेशनवरून श्रमीक एक्सप्रेसद्वारे या ५०७ मजुरांना स्वगृही पाठविण्यात येईल. त्याबाबतची अधिकृतस्तरावरील घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र प्रशासनाचे तसे नियोजन सुरू झाले आहे.
राजस्थानातील ४४ जणही परतणारराजस्थानमधील ४४ जणही त्यांच्या स्वत:च्या खासगी वाहनाने राजस्थानमध्ये पोहोचणार आहेत. त्यासंदर्भातील वैद्यकीय तथा महसूल प्रशासनस्तरावरील कार्यवाही पूर्णत्वास गेली आहे. या संबंधीत ४४ जणांचे स्वत:चे वाहन असल्याने तशी त्यांना त्यांच्या राज्यात जाण्याची परवानगी देण्यात आली असल्याची माहिती सुत्रांनी दिली.