लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: विधानसभा निवडणूकीसाठी २१ आॅक्टोबररोजी मतदान घेण्यात येत आहे. रविवारी सकाळी पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांनी जळगाव जामोद येथे कुटूंबियासह मतदानाचा हक्क बजावला. याशिवाय खामगावात भाजपाचे उमेदवार आमदार अॅड. आकाश फुंडकर, काँग्रेस उमेदवार ज्ञानेश्वर पाटील, नांदुऱ्यात काँग्रेस उमेदवार राजेश एकडे, मलकापूरात ना. चैनसुख संचेती यांनीही मतदान करून नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहीत केले.दुपारी १२ वाजेपर्यंत मलकापूर मतदारसंघात १४.७८ टक्के, खामगाव १७.९८ ट्कके, जळगाव जामोद १५.७१ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. खामगाव तालुक्यातील गारडगाव येथे इव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्याने एका तासाने उशिरा मतदान सुरु झाले. खामगावात भाजपा उमेदवाराने बुथ कॅप्चर केल्याचा आरोप करीत काँग्रेस उमेदवार ज्ञानेश्वर पाटील यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल नाही. यासह सखी मतदान केंद्रावर महिलांनी मतदानासाठी गर्दी केलेली दिसून आली.
शेगावात मतदान शांततेत शेगाव: शहरात व तालुक्यात मतदान प्रक्रिया अत्यंत शांततेत व उत्साहाच्या वातावरणात पार पडत आहे. नगराध्यक्षा शकुंतला बुच यांच्यासह खामगाव मतदारसंघाचे उमेदवार ज्ञानेश्वर पाटील यांनीही मतदानाचा हक्क बजावला. माजी आमदार दिलीपकुमार सानंदा व कार्यकर्ते मतदान केंद्राबाहेर यावेळी उपस्थित होते.