शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

पावसाच्या दडीचा वृक्षारोपणाला फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2017 1:00 AM

पंधरा दिवसांपासून पावसाची दडी : रोपे सुकली!

हर्षनंदन वाघ। लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात चार कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या वृक्षारोपण मोहिमेत विविध शासकीय यंत्रणा तसेच स्वयंसेवी संस्थांनी सहभाग घेतला. परिणामी, जिल्हा प्रशासनाने ८ लाख ५२ हजार वृक्ष लागवडीची उद्दिष्टपूर्ती करून भरीव कार्य केले; मात्र पावसाने दडी मारल्यामुळे या वृक्षारोपण मोहिमेला फटका बसण्याची शक्यता असून, अनेक ठिकाणी मोहिमेदरम्यान लावण्यात आलेली रोपे कोमजण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात ५० कोटी वृक्ष लागवड मोहीम तीन टप्प्यात राबविण्यात येत असून, पहिल्या टप्प्यात चार कोटी वृक्ष लागवड करण्यात येत आहे. त्यानुसार बुलडाणा जिल्ह्याला यावर्षी ८.५२ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून, वृक्ष लागवड मोहीम यशस्वी करण्यासाठी वन विभाग, सामाजिक वनीकरण, कृषी विभाग, नगर विकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, सहकार तथा वस्रोद्योग विभाग, शिक्षण विभागाचे प्राथमिक शिक्षण विभाग व माध्यमिक शिक्षण विभाग, गृह विभाग, आदिवासी विभागाच्या शाळा, सामाजिक न्याय विभाग, आरोग्य विभागाच्या जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक, महावितरण, अन्न औषध प्रशासनाचे दवाखाने, राज्य उत्पादन शुल्क विभाग, कारागृह विभाग, परिवहन विभागाचे राज्य परिवहन विभाग व उप प्रादेशिक परिवहन विभाग, विधी न्याय विभाग, जिल्हा परिषद सिंचन विभागाचे सिंचन विभाग व पाटबंधारे तसेच कौशल्य विकास विभाग, महसूल विभाग, बाल कल्याण विभाग, जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग, जिल्हा कोषागार कार्यालय, केंद्र सरकारचे बीएसएनएल व जिल्हा डाक कार्यालय, क्रीडा विभाग तसेच ग्राम विकास विभाग या प्रशासनाच्या मुख्य २६ यंत्रणा मोहिमेत सहभागी झाल्या. या २६ यंत्रणेच्या सहकार्याने जिल्हा प्रशासनाने उद्दिष्टपूर्ती करीत ८ लाख ६८ हजार ९८२ म्हणजे १.२१ टक्के वृक्ष लागवड केली आहे.मागिल १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे पेरणी झालेल्या पिकांसह वृक्षारोपण मोहिमेला मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे. आतापर्यंत सरासरी १९८.९ मि.मी. पाऊसजिल्ह्यात यावर्षी आतापर्यंत २५८५.८ मि.मी. म्हणजे सरासरी १९८.९ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यात मागिल १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनता चिंतेत आहे. पावसाच्या दडीचा फटका शासनाच्या वृक्ष लागवड मोहिमेला बसण्याची शक्यता आहे. कारण प्रत्येक तालुक्यात आतापर्यंत झालेला पाऊस अल्प आहे. त्यात बुलडाणा तालुक्यात २८९ मि.मी., चिखली २२४ मि.मी., देऊळगाव राजा १६५ मि.मी., लोणार २२१ मि.मी., मेहकर २७७ मि.मी., खामगाव १८२.४ मि.मी., शेगाव १२२ मि.मी., मलकापूर १२६ मि.मी., नांदुरा २४१ मि.मी., मोताळा २१३ मि.मी., संग्रामपूर ९८ मि.मी., जळगाव जामोद २०८ मि.मी., असा एकूण २५८५.८ म्हणजे सरसरी १९८. ९ मि.मी., पाऊस झाला आहे.रोपांसाठी नियमित १० मि.मी. पावसाची गरज वृक्षारोपण करताना प्लास्टिकच्या पिशवीतून रोप मातीच्या गोळ्यासह बाहेर काढण्यात येते. त्यामुळे वृक्षारोपण करताना मातीच्या गोळयाचा ओलावा असतो. हा ओलावा दोन दिवस टिकत असते. त्यानंतर रोपांसाठी नियमित दोन दिवसाआड १० मि.मी. पाण्याची गरज असते. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी पाणी देऊ शकत नसल्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीला वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येते. जिल्ह्यात १ ते ७ जुलै दरम्यान वृक्षारोपण करण्यात आले; मात्र मागिल १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे वृक्षारोपण मोहिमेतील वृक्ष रोपे कोमजण्याच्या मार्गावर आहेत. यावर्षी वृक्षारोपण मोहिमेला सर्वांनी सहकार्य केल्यामुळे उद्दिष्टपूर्वी झाली आहे; मात्र पाऊस नसल्यामुळे रोपावर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे. मोहिमेदरम्यान मातीच्या ओल्या गोळ्यासह जमिनीत वृक्षारोपण करण्यात येते. या मातीच्या गोळ्याची ओल दोन दिवस टिकते; मात्र जास्त दिवस पाणी न मिळाल्यास रोपावर परिणाम होऊ शकतो.- जी. ए. झोळे, तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी, बुलडाणा.