लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शहरासह जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह २ मे रोजी पाऊस पडला. या दरम्यान जळगाव जामोद तालुक्यातील वसाडी येथे अंगावर वीज पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.बुलडाणा शहरतात दुपारी तीन वाजेच्या सुमारास पावसास सुरूवात झाली. जोरदार वाऱ्यासह हरभऱ्याच्या आकाराच्या तुरळक गाराही यावेळी पडल्या. जवळपास सव्वा तास बुलडाणा शहरात हा पाऊस सुरू होता. या व्यतिरिक्त मेहकर तालुक्यातील डोणगाव, लोणार तालुक्यातील बिबी परिसरात हा पाऊस पडला आहे. या व्यतिरिक्त संपूर्ण जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक स्वरुपात पाऊस पडला आहे. खामगावमध्ये काही काळ पावसाची रिमझिम होती. या पावसामुळे भाजीपाला व कांदा पिकाचे काही प्रमाणात नुकसान केल्याचा अंदाज आहे.दरम्यान शेळीमेंढी घेऊन चारण्यासाठी गेलेला वसाडी बुद्रुक येथील अनंत श्रीकृष्ण बोडके (वय ३२) यांच्या अंगावर वीज पडून त्याचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी ही घटना घडली. त्यास नांदुरा रुग्ग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
वादळी वाऱ्यासह पाऊस; वीज पडून एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2021 11:25 AM