खामगाव(जि. बुलडाणा), दि. ३१: घाटाखालील सहा तालुक्यांमध्ये गत तीन आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्याने धोक्यात आलेल्या पिकांना मंगळवारी रात्री तसेच बुधवारी अधूनमधून झालेल्या रिमझिम पावसामुळे जीवदान मिळाले आहे. घाटाखालील खामगाव, शेगाव, नांदुरा, मलकापूर, संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यात गत तीन आठवड्यांपासून पावसाने दडी मारली होती. उडीद, मूग, सोयाबीन पिकाला ऐन फुलोरा येण्याची व शेंगा भरण्याची वेळ असताना पावसाने पाठ फिरविल्यामुळे पिके सोकून उत्पादनात घट येण्याची श क्यता निर्माण झाली होती. तसेच पावसाअभावी ज्वारी, कपाशी व इतर पिकांची वाढ खुंटून पिके पिवळी पडण्यास सुरुवात झाली होती. गत दोन वर्षांंंपासून दुष्काळाचा सामना केल्यानंतर शेतकर्यांनी यावेळी मोठय़ा आशेने पुन्हा एकदा कर्ज काढून पिकाचे उत्पादनासाठी मोठय़ा प्रमाणात खर्च केला आहे. मात्र ऐन पीक फुलोर्यात असताना पावसाने दगा दिल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. मात्र मंगळवारी रात्री तसेच बुधवारी अधूनमधून पाऊस बरसल्याने सुकत असलेल्या पिकांना जीवदान मिळाले असून, यामुळे शे तकर्यांना दिलासा मिळाला.
घाटाखाली पाऊस; शेतक-यांना दिलासा
By admin | Published: September 01, 2016 2:26 AM