शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

पावसाचा पिकांना फटका: विमा कंपनीकडे नुकसान नोंदविण्याची प्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 3:56 PM

आॅनालाईन नोंदणीसाठी अडचण आल्यास कृषी सहाय्यकांकडे नुकसान झाल्याच्या ७२ तासात माहिती देणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात सुरू असलेल्या संतधार पावसामुळे उडीद, मूग पिकाचे नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे, त्यांनी विमा कंपनीकडे आॅनलाइन नुकसान नोंदविण्याची प्रक्रिया सध्या सुरू झाली आहे. आॅनालाईन नोंदणीसाठी अडचण आल्यास कृषी सहाय्यकांकडे नुकसान झाल्याच्या ७२ तासात माहिती देणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. सध्या बºयाच भागामध्ये नुकसानाची महसूल विभागाकडून पाहणी सुरू आहे.जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणच्या मूग, उडीद, सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पावसामुळे बºयाच ठिकाणी पाणी साचून पिकांचे नुकसान झाले आहे. मूग, उडीद पिकाला कोंब आले आहेत. सोयाबीनही पिवळे पडल्याचे दिसून येते. अतिपावसाने धरणातील पाण्याचा साठा पूर्ण भरल्याने धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या शेतीमध्ये देखील पाणी जाऊन पिकांचे नुकसान झाले आहे.पुराच्या पाण्यामुळे काही ठिकाणची जमीन खरडून गेली आहे. सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा किंवा जमीन खरडून गेल्याने झालेल्या नुकसानाचा अहवाल आपल्या गावातील कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक यांच्याकडे देणे आवश्यक आहे. ज्या शेतकºयांनी पीक विमा काढलेला आहे, त्यांनी क्रॉप इन्शुरन्स अ‍ॅप्लीकेशन या मोबाईल अ‍ॅपद्वारे आॅनलाइन आपले नुकसान नोंदवावे, पीक विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर पिकाच्या झालेल्या नुकसानाची माहिती देण्यात यावी, असे जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पीक विमा कंपनीकडे आॅनलाइन माहिती भरल्या न गेल्यास कृषी सहाय्यक यांच्याकडून नुकसान नोंदणीकरीता सूचना पत्राचा अर्ज प्राप्त करून घेऊन तो अर्ज भरून कृषी सहाय्यक यांच्याकडे देणे आवश्यक आहे.

नदीकाठच्या शेतीचे नुकसानमेहकर तालुक्यातील अतिपावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मेहकर तालुक्यातील भालेगाव, पाचला, रायपूर, गवंढाळा, फरदापुर येथे सर्वाधिक नुकसान झाले आहे. मेहकर व लोणार तालुक्यात आठवडाभर संततधार पाऊस झाल्याने अनेक धरणाचे पाणी सोडण्यात आले. त्यामुळे नदीकाठच्या गावाच्या शेतीचे नुकसान झाले आहे. नुकसानाचे पंचनामा करण्याचे निर्देश महसूल विभागाला देण्यात आले आहेत.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी