बुलडाणा : जेथून नियम पाळण्याचे आदेश होतात. त्या जिल्हाधिकारी कार्यालयातच नियमाला हरताळ लावल्या जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात विविध विभागाच्या एकूण आठ ईमारती आहेत. यातील नव्याने बांधलेल्या दोन इमारती वगळता एकाही इमारतीला आतापर्यंंत रेन वाटर हार्वेस्टींग केलेले नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाची इंग्रजकालीन इमारत आहे. या जुन्या इमारतीमध्ये विविध विभाग आहेत. या इमारतीच्या पाठीमागील भागाला पनाळ लावून दोन ठीकाणी पाईपद्वारे पाणी जमिनीत सोडल्याचे दिसते. मात्र आता त्याचीही तोडफोड झाली आहे. इमारतीच्या समोरील भागाचे पावसाचे पडलेले पाणी मात्र, तसेच वाया जाते. जून्या इमारतीच्या समोर आणि पाठीमागे अलीकडेचे नव्याने दोन प्रशस्त इमारती बांधल्या आहेत. या इमारतींना रेनवॉटर हार्वेस्टींग केलेले दिसते. मात्र, याच परिसरात असलेल्या पंचायत समिती, उपविभागीय अधिकारी कार्यालय, उ पनिबंधक कार्यालय, विशेष भुसंपादन अधिकारी कार्यालय, पुरवठा कार्यालय ह्या विभागाच्या गेल्या अनेक वर्षापासूनच्या ईमारती आहेत. मात्र एकाही इमारतीला पावसाचे पडलेले पाणी आडवून ते जिरवण्याची व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे पावसाचे पडलेले लाखो लिटर पाणी वाया जाते. *पंचायत समिती, बुलडाणा ग्रामीण भागातील जनतेला पाणी आडवा, पाणी जिरवा चे सल्ले देण्या बरोबरच शासनाच्या ग्रामविकासाच्या विविध योजना राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्या पंचायत समितीच्या इमारतीलाच रेन वॉटर हार्वेस्टींगची व्यवस्था करण्यात आली नाही. *नगरपालिका, बुलडाणा रेन वॉटर हार्वेस्टींग करण्याची हमी दिल्याशिवाय बांधकामाची परवानगी न देणार्या बुलडाणा नगरपालिकेलाच रेन वॉटर हार्वेस्टींगचे वावडे असल्याचे दिसून आले. बुलडाणा नगरपालिकेचा कारभार आजही इंग्रजकालीन इमारतीत सुरू आहे. मात्र या इमारतीला पाईप लावून रेन वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे पावसाळ्यात येणारे लाखों लिटर्स पाणी वाया जाते.*बुलडाणा तहसील कार्यालय बुलडाणा तहसील कार्यालय असलेल्या जुन्या इमारतीत निवडणूक विभाग, निराधार योजना, पुरवठा विभाग तसेच तहसीलदार यांचे कार्यालय आहे. मात्र या इमारतीलाही रेनवॉटर हार्वेस्टिंगचे वावडे असल्याचे दिसून येते. *प्रशासकीय इमारत, बुलडाणाजिल्ह्याचा १६ विभागाचा प्रशासकी कामकाज येथील बसस्थानक समोर असलेल्या प्रशासकीय इमारतीतून चालत असतो. काही दिवसापूर्वी या इमार तीच्या तिसर्या मजल्यावर उपनिबंधक व भूमिअभिलेख कार्यालय सुरू करण्यात आले. यावेळी इमारतीची डागडुजी व रंगरंगोटी करण्यात आली. मात्र रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.*टीम लोकमतने असे केले स्टिंग ऑपरेशनबुलडाणा शहरातील काही निवडक शासकीय कार्यालयाची निवड केली. त्याठिकाणी लोकमतच्या प्रतिनिधींनी बुधवारी सकाळी ११ ते दुपारी १ च्या दरम्यान निवडलेल्या शासकीय कार्यालय परिसरात जाऊन पहाणी केली. निवडलेल्या कार्यालयापैकी जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन इमारतीत रेनवॉटर हार्वेस्टींग केल्याचे दिसून आले. तर इतर शासकीय कार्यालयात फक्त पनाट लावलेले होते. तर काही ठिकाणी पाईपची तुटफुट झालेली होती.
रेनवॉटर हार्वेस्टिंगविना कार्यालये
By admin | Published: July 17, 2014 12:07 AM