शेंदुर्जन गावात ९ सदस्य असलेली ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उतरून प्रत्येकालाच आपली ताकद आजमाविशी वाटणे स्वाभाविक आहे. त्यानुसार येथेही निवडणूक झाली पण समर्थकांच्या गटबाजीने येथे डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या नावाने एक पॅनेल उभे होते तर शिंगणे घराण्याचे समर्थक असलेल्या पण राजेंद्र शिंगणे गटाशी सख्य नसलेल्या दुसऱ्या गटाने थेट स्व. भास्करराव शिंगणे यांच्या नावाने दुसरे पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. निवडणूक अपेक्षेप्रमाणे चुरशीची झाली. निकालाअंती मात्र स्वर्गीय भास्करराव शिंगणे गटाने या निवडणुकीत बाजी मारली. एकाच नेत्याचे समर्थक असलेल्या या गावाने एक वेगळेच उदाहरण किंबहुना नवा पायंडा घालून दिल्याने पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या गावातील ही आपसी गटबाजी दूर करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
शेंदुर्जनमध्ये ‘राजेंद्र’ हारले ‘भास्करराव’ जिंकले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 4:36 AM