स्थानिक अनुराधा नगरमध्ये सोहळ्यात प्रकल्पाच्या उभारणीसाठी मदत दिलेल्या दात्यांचा जिल्हा काँग्रेस कमिटी व अनुराधा मेमोरीयल हॉस्पिटलच्या वतीने ऋणनिर्देश करण्यात येणार आहे. कार्यक्रम ऑनलाईन राहणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. या पार्श्वभूमीवर राहुल बोंद्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी २५ लाख रुपये किमतीचा ऑक्सिजन प्लांट लोकसहभागातून उभा केला आहे. यामध्ये जिल्हाभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी ८ लाख ५० हजार, तर हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अॅड. वृषाली बोंद्रे व संस्थेच्या महिलांनी पाच लाख, तर लोकसहभागातून ११ लाख ५० हजार रुपये याप्रमाणे सुमारे २५ लाख रुपयांचा निधी उभारून 'स्वर्गीय राजीव गांधी प्राणवायू प्रकल्प' पूर्णत्वास नेण्यात आला आहे. सुमारे ४० रुग्णांना एकावेळी प्राणवायू देण्याची क्षमता यामध्ये आहे. या प्रकल्पातून निर्माण होणारा प्राणवायू मोफत देण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण मुकुल वासनिक यांच्या हस्ते पार पडणार आहे.
कार्यक्रमास प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा जिल्हा निरीक्षक भा. ई. नगराळे, आमदार राजेश एकडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मनीषा पवार, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, राणा दिलीपकुमार सानंदा, बाबूराव पाटील, माजी मंत्री सुबोध सावजी, विजय अंभोरे, श्याम उमाळकर, संजय राठोड, मुक्त्यारसिंग राजपूत, नगराध्यक्ष कासम गवळी, अॅड. हरीश रावळ, जिल्हा परिषद सभापती ज्योती पडघान, लक्ष्मणराव घुमरे, स्वाती वाकेकर, ज्ञानेश्वर पाटील, संतोष आंबेकर, अनंतराव वानखेडे, रमेश घोलप, अविनाश उमाळकर, राजू वानखेडे, वर्षा वनारे, डॉ. धनोकार, तेजेंद्र चौहाण, हाजी रशीदखॉं जमादार, डॉ. अरविंद कोलते, रामविजय बुरूगंले, उषा चाटे, दत्ता काकस, सुनील तायडे, बालगजानन पाटील, सतीश मेहद्रे, देवानंद पवार, कलीम खान, राजेश मापारी, गजानन खरात उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन
जिल्ह्यातील काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल, महिला काँग्रेस, मागासवर्गीय सेल, अल्पसंख्याक सेल, विविध सेलचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या लोकार्पण व ऋणनिर्देश समारंभप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, तालुकाध्यक्ष समाधान सुपेकर, शहराध्यक्ष अतहरोद्यील काझी यांनी केले आहे.