लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : राजमाता मासाहेब यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज बुलडाणा शहरात जिजाऊप्रेमींनी भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करून लक्ष वेधले. स्थानिक राजमाता चौक येथे भव्य स्टेज उभारून सर्वप्रथम माँ जिजाऊंच्या पुतळ्याचे कोमल झंवर, अंजली परांजपे, पूजा गायकवाड, यमुना काकस, वंदना निकम, विजया राठी, अलका पाठक, कोमल भाग्यवंत, काजल पवार, दीपाली सुसर व इतर महिलांच्या हस्ते पूजन करण्यात आले. तद्नंतर संजीवनी बोराडे यांच्या जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली. माँ जिजाऊंच्या जीवनावर प्रकाश टाकणारे जिजाऊ चरित्राचे यावेळी जगदीशचंद्र पाटील यांनी उपस्थित महिला व युवतींना वाटप केले. यावेळी आधुनिक जिजाऊ ज्यांचे कार्य असामान्य असून, सामान्य जीवन जगणार्या प्रमिला सरोदे, रेखा तायडे, ज्योती बोराडे यांचा उपस्थितांच्या हातून भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार हर्षवर्धन सपकाळ, लोकनेते विजयराज शिंदे, योगेंद्र गोडे, संजय राठोड, जालिंधर बुधवत, संजय हाडे, मधुसुदन सावळे, विजय जायभाये, गजेंद्र दांदडे, दीपक रिंढे, शरद राखोंडे, दत्ता काकस, राजेश हेलगे, भारत शेळके, रसुल खान अरिफ सरपंच, प्रा.हेलगे, प्रा.सिरसाट, प्रा.रिंढे यांनी पूजन केले व रॅलीला सुरुवात झाली. भव्य रॅलीमध्ये अश्वारूढ जिजामाता यांच्या वेशभूषेत दीपाली सुसर, प्रेरणा रवी जाधव, छत्रपती शिवाजीराजे विशाल शेळके, संभाजीराजे प्रथमेश सुरूशे, मावळा म्हणून सागर राजपूत यांचे विशेष आकर्षण ठरले. या रॅलीमध्ये नगरसेवक अरविंद होंडे, आकाश दळवी, कैलास माळी, उमेश कापुरे, रामेश्वर वावरे, दीपक सोनुने, वैभव इंगळे, बाळू धुड यांच्यासह राजेश ठोंबरे, रवी पाटील, दीपक पवार, सचिन परांडे, o्रीराम देशमुख, अनंत रिंढे, अनुप o्रीवास्तव, जीवन उबरहंडे, मोहन पराड, बबलू मावतवाल, कांता चव्हाण, गजानन आदट्र, हर्षल जोशी यांच्यासह शहरातील महाविद्यालये, राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करणारे असंख्य महिला युवक-युवती, सहभागी झाले होते.
राजमाता जिजाऊंचा जयघोषाने बुलडाणा शहर दुमदुमले; युवकांनी काढली दुचाकी रॅली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 2:16 AM
बुलडाणा : राजमाता मासाहेब यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज बुलडाणा शहरात जिजाऊप्रेमींनी भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करून लक्ष वेधले.
ठळक मुद्देठिकठिकाणी नागरिकांनी केले रॅलीचे स्वागत