लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: देशासाठी शहीद होणारा समाज म्हणून राजपूत समाजाची जगात ओळख आहे. राज्य, धर्म वाचविणारा हा क्षत्रिय समाज स्वातंत्र्यानंतरही वंचित आहे. शासनाने या समाजाच्या त्यागाचा, बलिदानाचा सन्मान करणे जरुरीचे असून, समाजाचा योग्य सन्मान करून राजपूत समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी कोलारा येथे आयोजित समस्त राजपूत समाजबांधवांच्या भव्य मेळाव्यात केली.तालुक्यातील कोलारा येथे २७ ऑगस्ट रोजी समस्त राजपूत समाजबांधवांचा भव्य मेळावा o्री सिद्धेश्वर महाराज संस्थानमध्ये आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या अध्यक्षस् थानावरून राणा दिलीपकुमार सानंदा बोलत होते. यावेळी समजाचे ज्येष्ठ नेते मुख्त्यारसिंग राजपूत, महाराणा प्रताप पुतळा समितीचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंग राजपूत, राजपूत महासंघाचे संस्थापक सुभाषसिंह राजपूत, शंकरराव सोळंकी, साहेबराव सोळंकी, बाजार समितीचे उपसभापती ज्ञानेश्वर सुरूशे, जि.प. सदस्य शरद हाडे, पं.स. सदस्य मनीषा सपकाळ, अशोक सुरडकर, डॉ. प्रताप परिहार, राम जाधव, संध्या राजपूत, योगेंद्र कटारिया, पंकजसिंह ठाकूर, भारती शिसोदिया, जितेंद्र सूर्यवंशी, अजयसिंग सैगर, संजयसिंह नाईक, संतोष पवार, डॉ. संजयसिंह कच्छवे, राजेंद्रसिंह राजपूत, योगेंद्र राजपूत, सोनाली ठाकूर, बाबा ठाकूर, सुखदेवसिंह राजपूत, आनंद ठोके यांच्यासह अ.भा. क्षत्रिय महासभा, महाराणा ब्रिगेड, महाराणा क्रांती दल, राजपूत महासंघ, राजपूत युवा मंच आदी विविध संघटनांचे पदाधिकारी होते. यावेळी पुढे बोलताना राणा दिलीपकुमार सानंदा म्हणाले की, आमच्या पूर्वजांनी या मातीसाठी व भूमीसाठी रक्त सांडले आहे. राज्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत ९ टक्के राजपूत समाज आहे. असे असताना या राज्यात आजही न्याय मिळत नसल्याची खंत व्यक्त करीत संकटाला संधी समजून काम करू, तरच वास्तववादी राजपूत निर्माण होतील. आरक्षणाविनाही राजपूत समाजाचे अनेक तरुण मोठय़ा हुद्यावर आहेत. जर आरक्षण मिळाले तर समाजातील विद्यार्थ्यांना अपेक्षित क्षेत्रात चांगले स्थान मिळविता येईल, असा आशावाद व्यक्त करीत लवकर ना. रावळ यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांच्याकडे बैठक लावणार असून, आरक्षणासाठी समाजाला सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचेही सानंदा यांनी आर्वजून सांगितले. यावेळी बोलताना डॉ. संजयसिंग कच्छवे यांनी राजपूत समाज हा सर्वधर्म समभाव जपत असून, एकमेकांना मदत करणारा समाज असल्याचे स्पष्ट करीत समाजाच्या आरक्षणासंदर्भातील जाचक अटी काढण्यात येऊन भामटा हा शब्द न लावता सरसकट आरक्षण मिळावे, अशी मागणी केली. राजपूत समाजाच्या जातीच्या दा खल्याचा प्रश्न जटिल बनला असून, तो सुकर करण्यासाठी शासनाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष घालावे, अशी अपेक्षा आरक्षण महामोर्चाचे अजयसिंग सेंगर यांनी व्यक्त केली. तर डॉ. प्र तापसिंह राजपूत यांनी समाजाच्यावतीने सरकारसोबत आरक्षणासंदर्भाने कायदेशीर लढा सुरू असल्याचे सांगून राजपूत भामटा, भामटी, परदेशी राजपूत या सर्व पोटजाती एकच आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार, मनोहर जोशी यांच्या कार्यकाळामध्ये समाजाचे अनेक प्रश्न मार्गी लागले; परंतु आरक्षणाचा प्रश्न इंग्रजकालीन वसाहतीच्या नोंदी सोलापूर आणि पुणे जिल्हय़ातच आढळल्या; मात्र इतर जिल्हय़ात राजपूत समाजाच्या अस्तित्वाच्या नोंदी नसणे ही चूक प्रशासनाची आहे. त्याची शिक्षा समाजाला देण्यात येऊ नये व रक्ताचे नाते असल्यास ब्लड रिलेशननुसार बापाला असेल तर मुलाला व्हॅलीडीटीची गरज पडू नये व सरसकट आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी डॉ. राजपू त यांनी केली. -
स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही राजपूत समाज न्यायाच्या अपेक्षेत - सानंदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 10:52 PM
देशासाठी शहीद होणारा समाज म्हणून राजपूत समाजाची जगात ओळख आहे. राज्य, धर्म वाचविणारा हा क्षत्रिय समाज स्वातंत्र्यानंतरही वंचित आहे. शासनाने या समाजाच्या त्यागाचा, बलिदानाचा सन्मान करणे जरुरीचे असून, समाजाचा योग्य सन्मान करून राजपूत समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी कोलारा येथे आयोजित समस्त राजपूत समाजबांधवांच्या भव्य मेळाव्यात केली.
ठळक मुद्देकोलारा येथे पार पडला समस्त राजपूत समाजबांधवांचा मेळावा आरक्षणासाठी समाजाला सर्वोतोपरी सहकार्य करणार