नांदुरा : येथून बुलडाण्याकडे जात असलेल्या भरधाव कारचे समोरचे टायर फुटल्याने कार झाडावर जाऊन आदळली. वाघजाळ फाटा ते राजुर दरम्यान बुधवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या या भीषण अपघातात एक जण जागीच ठार, तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला.नांदुरा पंचायत समितीअंतर्गत कार्यरत असलेल्या दोन ग्रामसेवकांच्या कारला बुधवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या अपघातात १ ग्रामसेवक ठार तर १ गंभिर जखमी झाले आहेत. चांदुर बिस्वा व रसूलपुर येथे कार्यरत ग्रामसेवक तथा ग्रामसेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष देवेन्द्र बरडे व तरवाड़ी व दादगाव येथे कार्यरत ग्रामसेवक सुनील फासे हे नांदुरा येथून बरडे यांच्या कारने बुलडाणा येथे जात होते. वाघजाळ फाटा ते राजूर दरम्यान कारचे समोरचे टायर फुटल्याने गाडी झाडावर आदळली. यामध्ये गाडीचा चुराडा झाला व ग्रामसेवक सुनील फासे हे जागीच ठार झाले तर देवेन्द्र बरडे हे गंभीररित्या जखमी झाले. बरडे यांना बुलडाणा येथील राजपूत ट्रामा केयर सेंटर येथे उपचारार्थ भरती करण्यात आले असून फासे यांचेवर बुलडाणा अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
राजुर घाटात टायर फुटल्याने भरधाव कार झाडावर आदळली; ग्रामसेवक ठार, एक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 1:41 PM
नांदुरा : येथून बुलडाण्याकडे जात असलेल्या भरधाव कारचे समोरचे टायर फुटल्याने कार झाडावर जाऊन आदळली. वाघजाळ फाटा ते राजुर दरम्यान बुधवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या या भीषण अपघातात एक जण जागीच ठार, तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला.
ठळक मुद्दे वाघजाळ फाटा ते राजुर दरम्यान बुधवारी मध्यरात्रीनंतर घडली घटना.अपघातात गाडीचा चुराडा झाला व ग्रामसेवक सुनील फासे हे जागीच ठार झाले. जखमी बरडे यांना बुलडाणा येथील राजपूत ट्रामा केयर सेंटर येथे उपचारार्थ भरती करण्यात आले.