बुलडाणा : बुलडाणा-मलकापूर मार्गावर असलेला राजूर घाटातील हनुमान मंदिर वळणावर रस्त्याच्या सुरक्षा भिंतीला धडक देऊन टँकर उलटला. ही घटना ५ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने यात वाहनचालक बचावला. टँकरमध्ये साबण तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे कच्चे तेल भरले होते. अपघातानंतर हे कच्चे तेल संपूर्ण रस्त्यावर पसरले. कर्नाटक येथून साबण तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे कच्चे तेल घेऊन एमपी 0९ एचजी १0४७ क्रमांकाचा टँकर मध्यप्रदेशाकडे जात होता. आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास टँकर बुलडाणा-मलकापूर मार्गावरील राजूर घाटातून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे भरधाव वेगात टँकर घाटातील रस्त्याच्या सुरक्षा भिंतीला धडक देत उलटला.या दरम्यान वाहनचालक डोंगरसिंग रा.कालीदेवी जिल्हा झाबुआ, मध्यप्रदेश याने कॅबिनमधून उडी मारल्यामुळे सुदैवाने तो बचावल्याचे प्रत्यक्षदश्रीने सांगितले; मात्र टँकर फुटल्याने यात असलेले साबण तयार करण्याचे कच्चे तेल संपूर्ण रस्त्यावर पसरले. यामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक ठ प्प झाली होती. तेलावरुन घसरली वाहनं बुलडाणा-मलकापूर मार्ग वाहतुकीचा असल्यामुळे या मार्गावर दुचाकी, चारचाकी खासगी प्रवासी वाहनांची मोठी वर्दळ असते. आज अपघातानंतर हनुमान मंदिर वळणरस्त्यावर साबणाच्या कच्च्या तेलाचा थर साचला होता. त्यामुळे या तेलाच्या थरावरुन जवळपास सात-आठ मोटारसायकली घसरल्या. कोणालाही हानी झाली नाही. वृत्त लिहिपर्यंत याबाबत पोलिसांत नोंद झाली नव्हती.
राजूर घाटात टँकर उलटला!
By admin | Published: April 06, 2016 12:35 AM