कोरोना काळात रक्तपेढ्यांमधील रक्तसाठा हा कमी झाला आहे. गरजू रुग्णांना रक्त मिळणे कठीण झाले आहे . आपण केलेल्या रक्तदानामुळे एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचू शकतात . आज देशाला रक्ताची नितांत गरज आहे . त्या अनुषंगाने साखरखेर्डा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे . या शिबिराला अनिकेत सैनिक स्कूल , श्री शिवाजी व्यायाम शाळा , ज्ञानगंगा मार्गदर्शन केंद्र , प्राथमिक आरोग्य केंद्र , जिल्हा परिषद सदस्य , माजी जिल्हा परिषद सदस्य , सरपंच , माजी सरपंच , ग्रामपंचायत सदस्य , विविध पक्षाचे पदाधिकारी मोलाचे सहकार्य करणार आहेत . आपणही एक जबाबदारी म्हणून रक्तदान शिबिरात भाग घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे़ प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र देण्यात येऊन सन्मान करण्यात येणार आहे़
साखरखेर्डा येथे उद्या रक्तदान शिबिराचे आयाेजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 4:25 AM