लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव: काेराेना महामारीचा वाढता प्रभाव व शासनाने घोषित केलेला लॉकडाऊनमुळे गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा राम जन्मोत्सव संतनगरी शेगाव शहरात भक्ता विना साजरा करण्यात आला.राम नवमी उत्सवानिमित्त केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारताच्या विविध राज्यातील तसेच विदेशातूनही तीन ते चार लाख भाविक शेगाव शहरात गर्दी करीत असतात. रामनवमीची यात्रा शेगावातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाते. श्री संत गजानन महाराज यांच्या हयातीतच त्यांनी सांगितल्या प्रमाणे शेगाव शहरात रामनवमी यात्रा करण्याची परंपरा सुरू झाली आहे. गुढीपाडवापासूनच शेगाव शहरात श्री संत गजानन महाराज यांचे आराध्य दैवत असलेल्या मयार्दापुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांच्या भक्तीमध्ये संपूर्ण शेगाव शहर रंगून जात होते. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आदी विविध राज्यातील शेकडो व्यवसायिक संसारोपयोगी वस्तूंची व खेळणीची दुकाने थाटत होते. मात्र गेल्यावर्षी पहिल्यांदाच कोरोनामुळे शेगाव शहरात दरवर्षी भरणारी रामनवमी यात्रा रद्द करण्यात आली होती. यावर्षी सुद्धा कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन यात्रा रद्द करण्यात आली आहे. श्रींचे मंदिरेही दर्शनासाठी बंद असल्याने गर्दी होऊ नये याकरिता राज्य शासनाने २१ एप्रिल पासूनच राज्यांमध्ये कडक टाळेबंदी प्रतिबंध घोषित केल्यामुळे बाहेरगावावरून भक्त शेगावात दाखल झाले नाहीत. त्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर सामसूम झालेले दिसत होते. कोरोनामुळे रामनवमी दोन वषार्पासून शेगाव शहरात साजरी होत नसल्यामुळे राम भक्तांमध्ये नैराश्य पसरलेले दिसत आहे. दरम्यान साध्या पध्दतीने रामनवमी साजरी करण्यात आली.
शेगावात साधेपणाने साजरी झाली राम नवमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 12:08 PM