लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : खार्या पाण्याच्या सरोवर परिसरात अखंड वाहत असलेला गोड पाण्याचा रामगया झरा तब्बल सात वर्षांपासून आटला आहे, तर पापहरेश्वर ये थील धारही दोन वर्षांपासून आटली आहे. अनावश्यक बोअरवेलमुळे हा प्रकार झाला असल्याची ओरड आहे.परिणामी, लोणार सरोवर परिसराच्या संवर्धनाबाबत प्रशासन किती जागरुक आहे, याची कल्पना यावी. येथील शासकीय विश्रामगृहापासून सरोवरात पायर्यांनी उतरल्यानंतर हेमांडपंथी पश्चिमाभिमुख रामगया मंदिर आहे. तीन द्वार असलेल्या या मंदिरात रामाची मूर्ती असून, बाजूलाच श्रीरामेश्वर मंदिर आहे. या मंदिराच्या समोरच रामकुंड बुजलेल्या स्थितीत दिसून येतो. थोडे खाली उतरले की, सात वर्षांपूर्वी अखंड वाहणारा स्वच्छ व शुद्ध पाण्याचा रामगया नावाने प्रसिद्ध असलेला झरा आटलेल्या स्थितीत आहे. जागतिक पर्यटन स्थळ लोणार सरोवर पाहण्यासाठी येणारे देश-विदेशातील पर्यटक तसेच अनेक शैक्षणिक सहली निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी सरोवरात उतर तात. त्यांच्यासाठी हा झरा ओअँसीसची भूमिका निभावत होता; मात्र तोच आता आटल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. रामगया झर्यापाठोपाठ गेल्या दोन वर्षांपासून पापहरेश्वर धार ही आटलेली आहे. राज्यातून अनेक भाविक अस्थी विसर्जन करण्यासाठी येत होते. त्यानंतर याच ठिकाणी अनेक धार्मिक विधी केल्या जात होते. या धारेचेही गोडे पाणी होते. अखंड वाहणारी पापहरेश्वर धार ही दोन वर्षांपासून आटलेली आहे. त्याच्या संवर्धनाच्या दृष्टीने प्रशासन मात्र असंवेदनशील आहे.
विंधन विहिरीची समस्यालोणार सरोवर परिसरालगत बांधकामे तसेच उत्खनन करण्यास बंदी अस तानाही अनेक वर्षांपासून बांधकामे सुरूच आहेत. सरोवर परिसरालगत किमान ५00 ते ७00 फूट बोअर घेतलेले आहेत. त्यात आणखी वाढ होत आहे. त्याचा परिणाम येथील पर्यावरण संतुलनावर होत आहे.