शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

उजव्या बाजूने हृदय असलेला दुर्मीळ व्यक्ती

By admin | Published: June 04, 2017 5:20 AM

वैद्यकीय तपासण्यांमध्ये त्याचे हृदय चक्क उजव्या बाजूला असल्याचे आढळून आल्यानंतर डॉक्टरही चक्रावून गेले.

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : मनुष्याचे हृदय छातीत डाव्या बाजूला असते, हे सर्वश्रुत आहे; परंतु लाखात एखाद्याचे हृदय उजव्या बाजूने असू शकते, असाच एक दुर्मीळ व्यक्ती खामगावनजीकच्या घाटपुरी गावात आढळून आला आहे. अरुण श्यामराव तायडे वय ४२, रा. घाटपुरी ता.खामगाव असे या व्यक्तीचे नाव आहे. वैद्यकीय तपासण्यांमध्ये त्याचे हृदय चक्क उजव्या बाजूला असल्याचे आढळून आल्यानंतर डॉक्टरही चक्रावून गेले. हृदय उजव्या बाजूने असले तरी सर्व शारीरिक क्रिया या डाव्या बाजूने हृदय असणाऱ्यांप्रमाणे सुरळीत असतात, असे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले. शहरातील एका लॉटरी सेंटरवर काम करणारे अरुण तायडे यांच्या छातीत दुखत असल्यामुळे ते काही दिवसांपूर्वी शहरातील नामांकीत डॉ. सुरेंद्र जैन यांच्याकडे गेले. यावेळी डॉ.जैन यांंनी त्यांची तपासणी केली असता, हृदय उजव्या बाजूने असल्याचे आढळले. छातीत दुखत असल्यामुळे डॉ.जैन यांनी तायडे यांना एन्जिओग्राफी करण्याचा सल्ला दिला. त्यावर तायडे यांनी अहमदनगर येथील आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये जावून तपासणी केली. यामध्येसुद्धा तायडे यांचे हृदय उजव्या बाजूने असल्याचे; पण सुरळीतपणे काम करीत असल्याचे आढळून आले., तर असे उदाहरण लाखात एखादेच असून, हे फक्त वेगळेपण आहे. त्याचा कोणताही विपरित परिणाम होत नाही.