चिखली : गेल्या अनेक दिवसांपासून मेहकर फाटा ते राऊत वाडी, तसेच शेलूद ते बसस्टँड या मुख्य मार्गावरील अपघाताचे प्रमाण वाढले असल्याने या महामार्गावर ठिकठिकाणी गतिरोधक बसवून वाहनांच्या गती नियंत्रित ठेवण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने १५ सप्टेंबर रोजी स्थानिक सिद्धसायन्स चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
शहरातून जाणाऱ्या महामार्गावर गतिरोधक नसल्याने अपघातांची मालिका सुरू आहे. यामध्ये अनेकांचा जीव गमावावा लागला आहे, तर अनेक महिला व विद्यार्थी अपंग झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर गतिरोधक बसविण्याची मागणी होत असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत १५ सप्टेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प पडली होती. दरम्यान, आंदोलनाची दखल घेऊन चिखलीचे ठाणेदार व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत, संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता एका आठवड्याच्या आत स्पीड ब्रेकर टाकण्याचे आश्वासन संबंधितांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते प्रा. नरेंद्र खेडेकर, शिवसेना सहसंपर्कप्रमुख भास्करराव मोरे, उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव देशमुख, तालुकाप्रमुख कपिल खेडेकर, शहरप्रमुख श्रीराम झोरे, युवासेना उपजिल्हाप्रमुख रोहित खेडेकर, युवासेना तालुकाप्रमुख नंदू कऱ्हाडे, प्रीतम गैची, विलास घोलप, नगरसेवक दत्ता सुसर, श्याम शिंगणे, आनंद गैची, प्रलय खरात, समाधान जाधव, दत्ता देशमुख, रवीअप्पा पेटकर, शंभू गाडेकर, अनिल जावरे, राहुल शेलकर, दीपक मगर, मंगेश इंगळे, बंटी लोखंडे, बंटी कपूर, शैलेश डोणगावकर, संतोष जाधव, आकाश महाशब्दे, राहुल पवार, आकाश शिंदे, मयूर देशमुख, पवन चिंचोले, गोलू चिडे, दिलीप खपके, अमर सुसर, पप्पू परिहार, पुंजाजी शेळके, राहुल भालेराव, शेख बबलू, बंडू नेमाने, गणेश कुडके आदी शिवसैनिक उपस्थित होते.