- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : सार्वजनिक प्रणालीतंर्गत मोफत मिळालेल्या रेशनच्या तांदळाची चक्क ८-१० रुपये किलोने सर्रास विक्री होत आहे. भुसार मालाचे व्यापारी, भंगार व्यावसायिक आणि किरकोळ दुकानदार या तांदळाची खरेदी करीत असल्याचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’ स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आले. खामगाव-शेगाव तालुक्यात रेशनचा तांदूळ खरेदी करताना वेगवेगळ्या घटनेत आतापर्यंत ०७ जणांवर पोलिस कारवाई करण्यात आली. हे येथे उल्लेखनिय!कोरोना नैसर्गिक आपत्ती कालावधीत सार्वजनिक वितरण प्रणालीतंर्गत जिल्ह्यातील सुमारे ४३ हजार रेशनकार्ड धारकांना कार्डावरील प्रतिव्यक्ती पाच किलो प्रमाणे तांदूळ वितरीत करण्यात आला. मार्च-एप्रिल आणि मे या तिन महिन्यांच्या कालावधीत वितरीत करण्यात आलेल्या तांदळाचा मोठा साठा लाभार्थ्यांकडे जमा झाला. अशातच कोरोना कालावधीत अनेकांच्या हाताला काम नसल्याने गरीब लाभार्थ्यांकडे जमा झालेला तांदूळ खरेदी करणारे मोठे रॅकेट सक्रीय झाले. गरीब आणि रेशनकार्ड लाभार्थ्यांना पैशांचे आमिष दाखवून तांदळाची खरेदी केली जात आहे. गावातील किरकोळ व्यावसायिक तसेच भंगार विक्रेते हा तांदूळ खरेदी करतात. त्यांच्याकडे आलेल्या तांदूळ पुन्हा मोठे व्यापारी करीत आहे. एक मोठे रॅकेटच सक्रीय झाले असून, खामगाव तालुक्यातील तांदूळ खरेदीसाठी जळगाव जामोद तालुक्यातील भुसावळ येथील व्यापारी आणि विक्रेते येत असल्याचे वास्तव असून, अकोला जिल्ह्यातही हा तांदूळ एका विशिष्ट रॅकेट मार्फत पोहोचविल्या जात आहे.
किरकोळ व भंगार विक्रेत्यांकडून खरेदी!्र्रंसार्वजनिक वितरण प्रणालीतंर्गत रेशन लाभार्थ्यांना मोफत मिळालेला तांदूळ लाभार्थ्यांकडून गावातील किरकोळ व भंगार विक्रेते सर्रास खरेदी करीत आहे. ठराविक तांदूळ जमा झाल्यानंतर आॅटो तसेच वाहनातून या तांदळाची पुढे वाहतूक केली जात आहे.
मोफत तांदळाची ८-१० रूपये किलोने विक्री!कोरोना-१९ लॉकडाऊन कालावधीत तीन महिन्यांत रेशन कार्डावरील प्रति लाभार्थी पाच किलो प्रमाणे तांदूळ मोफत देण्यात आला. लाभार्थ्यांकडे मोठ्याप्रमाणात तांदूळ गोळा झाला. कोरोना आपत्ती काळात आता या तांदळाची लाभार्थ्यांकडून विक्री केली जात आहे.खामगाव आणि शेगाव तालुक्यात रेशनच्या तांदळाची खरेदी करणारे रॅकेट सक्रीय असल्याचे समोर येत आहे. यासंदर्भात शेगाव आणि खामगाव तालुक्यात ०७ कारवाई करण्यात आल्या आहेत. यामध्ये ०२ कारवाई पुरवठा निरिक्षकांनी केल्या आहेत. तर उर्वरित कारवाई आपण स्वत: केल्यात.- व्ही.एम.भगतपुरवठा अधिकारी,खामगाव-शेगाव.