मासरुळ येथील स्वस्त दुकानदारास १६ ऑगस्ट राेजी रात्री ८ वाजता बुलडाणा तहसील पुरवठा विभागाच्या वतीने गहू आणि तांदूळ पाठविण्यात आले. स्वस्त धान्य वाहन क्र. एमएच २८ एटी ७३७६ ने शंकर त्र्यंबक माळाेदे यांच्या दुकानात माल उतरविण्यात आला. यावेळी चलननुसार चार ते पाच कट्टे गहू गाडीमध्ये कमी आढळला. त्यामुळे स्वस्त दुकानदारांने पंचासमक्ष हा माल उतरविला असता, पाच कट्टे गहू कमी आढळले. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी मासरूळ येथील माजी सरपंच मधुकर सिनकर व मासरुळ येथील शिवसेना अध्यक्ष दिलीप माळोदे व सरपंच पुत्र मधुकर महाले यांनी केली.
काेट
स्वस्त धान्य दुकानदारास कमी आलेले स्वस्त धान्य आम्ही पुढच्या वेळी देऊ, तसेच संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करू.
- अमरसिंग पवार, पुरवठा अधिकारी, बुलडाणा.