सुधीर चेके पाटील। लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : एकेकाळचे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक व एकमेकांना अक्षरश: पाण्यात पाहणारे दोन नेते अनेक वर्षांनंतर एकत्नित आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आणि चिखलीचे आमदार राहुल बोंद्रे यांच्यातून विस्तवसुद्धा जात नव्हता; पण ३ मार्च रोजी शनिवारी झालेल्या भारतीय जैन संघटनेच्या ‘सुजलाम सुफलाम’ कार्यक्रमानंतर रविकांत तुपकर व आ. राहुल बोंद्रे यांनी एकत्नित सेल्फी काढला व त्यानंतर पुन्हा दुसर्या दिवशी ४ मार्च रोजी चिखली येथे खैरूशा बाबा यांच्या यात्नेनिमित्त निघालेल्या संदलमध्ये रविकांत तुपकर व आ. बोंद्रे एकाच वेळी आले असता त्यांचा एकत्नित सत्कार करण्यात आला व ढोल-ताशा आणि नगार्यांच्या तालावर तुपकरांनी व आ. बोंद्रेंनी एकत्नित ताल धरून नाचलेत व त्यातच तुपकरांनी भाजपविरोधात आक्रमकपणे रान उठविले आहे. या सगळय़ा गोष्टी राजकीय मनोमिलनाचे संकेत तर नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते रविकांत तुपकर आणि चिखलीचे काँग्रेसचे आमदार राहुल बोंद्रे यांच्यातील हाडवैर जिल्हय़ा तील लोकांना सर्वश्रुत आहे. २0१४ मध्ये जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या थकीत कर्ज प्रकरणावरून ‘स्वाभिमानी’चे नेते रविकांत तुपकर यांनी बंड उभे केले. या नेत्यांच्या विरोधात जिल्हाभरात रान पेटवले होते. आधी राजकीय नेत्यांकडे थकीत असलेले कर्ज भरा, तरच शे तकर्यांकडील थकीत कर्ज भरल्या जाईल, अशी भूमिका घेत जिल्हाभर तुपकरांनी या नेत्यांच्या विरोधात मोहीमच उघडली होती. अजूनही रविकांत तुपकरांची आ.बोंद्रेसह बड्या नेत्यांविरुद्ध उच्च न्यायालयात लढाई सुरू आहे. यादरम्यान जिल्हाभरात रविकांत तुपकर यांनी मिळेल त्या स्टेजवरून राहुल बोंद्रे यांचे चांगलेच वस्त्नहरण केले होते. अगदी खालच्या शेलकी भाषेत या दोन नेत्यांनी एकमेकांविरोधात भाषणबाजी केल्याचे लोकांना आजही ठाऊक आहे. एवढेच काय, या दोन नेत्यांचा हा संघर्ष कार्यालय फोडाफोडीपासून ते पोलीस स्टेशनपर्यंत अनेकदा गेला होता; पण असे म्हणतात, राजकारणामध्ये कधीच कोणी कुणाचा कायमचा शत्नू किंवा मित्न नसतो आणि त्याचाच प्रत्यय नुकताच बुलडाणा येथील एका कार्यक्रमात आला. त्याचे असे झाले, की भारतीय जैन संघटना व प्रशासनाच्यावतीने सुजलाम सुफलाम या कार्यक्रमाच्या शुभारंभासाठी मुख्यमंत्नी देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्नी नितीन गडकरी ३ मार्च रोजी बुलडाण्यात आले होते. निमित्त होते जिल्हय़ातील धरणातील गाळ काढण्याच्या जेसीबी मशीनचे पूजन करण्याचे. हा गाळ काढण्यासाठी भारतीय जैन संघटनेने जिल्हय़ात १३४ जेसीबी मशीन आणल्या आहेत. स्थानिक एआरडी मॉलजवळ शिस् तबद्धपणे एका रांगेत उभ्या असलेल्या या जेसीबी मशीनजवळ प्रशासनाने एक सेल्फी पॉइंटही तयार केला आहे. या सेल्फी पॉइंटवर अनेक बुलडाणेकर आपला सेल्फी काढून घेत आहेत. ३ मार्च रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांसह अनेक ‘व्हीआयपी’ यांनासुद्धा या जेसीबीजवळ आपला सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. त्यात राहुल बोंद्रेसुद्धा मागे कसे राहतील, मात्न त्यांनी जो सेल्फी घेतला, त्याची जिल्हाभर चर्चा आहे. आ. राहुल बोंद्रे यांनी कार्यक्रमस्थळी थेट रविकांत तुपकर यांना आवाज देऊन ‘चला रविकां तजी एक सेल्फी घेऊ या’ म्हणून बोलाविले असता रविकांत तुपकर यांनीसुद्धा त्यांना तितक्याच तत्परतेने प्रतिसाद दिला व दोघांनीही हसत खेळत जेसीबी मशीनसोबत एक सेल्फी काढला. आ. राहुल बोंद्रे आणि रविकांत तुपकर यांच्यातून विस्तवसुद्धा जात नाही, एकमेकांना ते कधी ‘हाय हॅलो’सुद्धा करीत नाही; पण आज अचानक दोघेही सेल्फी घेत आहेत, हे दिसल्यावर अनेकांनी या दोन नेत्यांसोबत आपलासुद्धा सेल्फी असावा म्हणून एकच गर्दी केली. या दोघांच्या सेल्फीमुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या. या सेल्फीच्या निमित्ताने या दोन नेत्यांचे राजकीय मनोमिलन तर झाले नाहीना, अशाही चर्चा रंगू लागल्या. विशेष म्हणजे, काही तासांतच रविकांत तुपकर आणि आ.राहुल बोंद्रे यांचा तो सेल्फी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला, तर दुसर्या दिवशी ४ मार्च रोजी रविकांत तुपकर व आ. राहुल बोंद्रे चिखली येथील संदलमध्ये दोन्ही नेते एकाच वेळी पोहोचले. चिखलीचे नेते रफीक कुरेशी यांनी तु पकर व आ. बोंद्रे यांचा एकत्नित सत्कार केला. एवढेच नाही, तर या संदलमध्ये आ. बोंद्रे व रविकांत तुपकर यांनी ढोल-ताशे व नगार्यावर तालही धरला. दोघांनाही नाचण्याचा मोह आवरला नाही. एकंदरीतच या दोन्ही घटनेवरून या दोन्ही नेत्यांच्या राजकीय मनोमिलनाचे संकेत मिळ त आहेत, एवढे मात्न खरे!
रविकांत तुपकर, राहुल बोंद्रे यांचा ‘राजकीय सेल्फी’! मनोमिलनाचे संकेत ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 1:07 AM
चिखली : एकेकाळचे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक व एकमेकांना अक्षरश: पाण्यात पाहणारे दोन नेते अनेक वर्षांनंतर एकत्नित आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आणि चिखलीचे आमदार राहुल बोंद्रे यांच्यातून विस्तवसुद्धा जात नव्हता; पण ३ मार्च रोजी शनिवारी झालेल्या भारतीय जैन संघटनेच्या ‘सुजलाम सुफलाम’ कार्यक्रमानंतर रविकांत तुपकर व आ. राहुल बोंद्रे यांनी एकत्नित सेल्फी काढला.
ठळक मुद्देढोल-ताशा आणि नगार्यांच्या तालावर तुपकरांनी व आ. बोंद्रेंनी एकत्नित ताल धरून नाचलेत