लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: सर्वसामान्य नागरिकांसाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. शासनाच्या या कल्याणकारी योजना सर्वत्र पोहचवा, असे आवाहन खासदर प्रतापराव जाधव यांनी केले. भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत असलेल्या नेहरू युवा केंद्र बुलडाणाद्वारा जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित जिल्हास्तरीय युवा संमेलन, युवाकृती व जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्ष उमा तायडे, तर प्रमुख अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जालिंधर बुधवत, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक हरिहर जिराफे, प्रा. हरीश साखरे, प्रा. अविनाश गेडाम, अजयसिंग राजपूत हे उपस्थित होते. प्रास्ताविक नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक हरिहर जिराफे यांनी केले. राष्ट्रीय युवा नेता कार्यक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचे विमोचन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सत्यमेव जयते शिक्षण व बहूद्देशीय संस्था, महिमळ ता. चिखली यांना वर्ष २0१७-१८ चा जिल्हा युवा पुरस्कार रुपये २५ हजार, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. संस्थेचे सचिव नितेश थिगळे यांच्यासह संस्थेतील पदाधिकार्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. तसेच नगर परिषद मेहकरद्वारा स्वच्छता दूत म्हणून निवड करण्यात आलेले नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक सागर कडभने, जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे पहिले बक्षीस पटकविणार्या शीतल विष्णू खण्ड हिला रुपये ५00 स्मृतिचिन्ह देऊन या दोघांचा सन्मान करण्यात आले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.
शासनाच्या कल्याणकारी योजना सर्वत्र पोहचवा - प्रतापराव जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 11:57 PM
बुलडाणा: सर्वसामान्य नागरिकांसाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. शासनाच्या या कल्याणकारी योजना सर्वत्र पोहचवा, असे आवाहन खासदर प्रतापराव जाधव यांनी केले.
ठळक मुद्देनेहरू युवा केंद्राद्वारे जिल्हास्तरीय युवा संमेलन सांस्कृतिक कार्यक्रमात युवकांना आवाहन