बुलडाणा : सर्वच अभियानात बुलडाणा अव्वल आहे; मात्र स्वच्छ भारत अभियानात आपली प्रगती खूप कमी आहे, त्यामुळे या अभियानात लोकसहभाग वाढवून या अभियानाचा उद्देश सफल करा, असे आवाहन करतानाच जिल्हा परिषदने गुड मॉर्निंग पथक पुन्हा सक्रिय करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. बुलडाण्यात वैयक्तिक स्वच्छालये वाढली पाहिजेत त्यासाठी शासनाच्या विविध योजना असून, या योजनांचा लाभ घेण्याचेही आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी दीपा मुधोळ यांना जिल्हा परिषद प्रशासनाने गुड मॉर्निंग पथक पुन्हा सक्रिय करण्याबाबत निर्देश दिले. संबंधित गावातील तलाठी, ग्रामसेवक व इतर सरकारी कर्मचारी यांची मदत घेऊन लोकांना शौचालयाची निर्मिती व वापर वाढविण्याबाबत प्रोत्साहित करावे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. बुलडाणा जिल्हा शौचालयाच्या बाबतीत केवळ ४६ टक् क्यांवर आहे त्यामुळे या अभियानाला गती देण्यासाठी संबंधितांना स्पष्ट निर्देश देण्यात येतील, अशी माहिती मुकाअ मुधोळ यांनी दिली.
गुड मॉर्निंग पथक पुन्हा सक्रिय करा
By admin | Published: April 18, 2015 2:00 AM