बुलडाणा: वर्ग पाचवी ते नववी मध्ये शिक्षण घेत असलेल्या बुलडाणा शहरातील विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी सुट्टीत १४ एप्रिल ते १५ जून अशा दोन महिन्याच्या कालावधीत जी मुलं जेवढी गोष्टींची पुस्तके वाचतील तेवढ्या रुपयांचे त्यांना पुस्तक मैत्री बालवाचनालयाकडून बक्षीस देण्यात येणार आहे. वाचन संस्कृती टिकविण्यासाठी वाचनालयाचा हा उपक्रम सर्वांसाठी आदर्श ठरत आहे. मोबाईल व संगणकच्या युगात वाचन संस्कुतीपासून मुले दुरावली आहेत. त्यामुळे वाचन संस्कृती जपण्याच्या उद्देशाने बुलडाण्यातील वाचनालयाकडून विशेष अभियान हाती घेण्यात आले आहे. आजपाचवी ते नववी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी सुट्टीतील दोन महिन्याच्या कालावधीत जी मुलं जेवढी गोष्टींची पुस्तके वाचतील तेवढ्या रुपयांचे त्यांना पुस्तक मैत्री बालवाचनालयाकडून बक्षीस जाहीर करण्यात येणार आहे. साठ दिवसात १२० पेक्षा जास्त पुस्तके गोष्टींची मुले वाचू शकतात. बाल-कुमार मुलांमध्ये वाचन संस्कृतीची आवड निर्माण करण्यासाठी हा उपक्रम प्रगती सार्वजनिक वाचनालय व पुस्तकमैत्री बालवाचनालय च्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे. या ऊन्हाळी वाचन अभियानासाठी फक्त शंभर विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दर रविवारी महाराष्ट्रातील मान्यवर साहित्यिक, कवी, लेखक स्वत: कविता कशी लिहावी, गोष्ट कशी लिहावी, अभिनय कसा करावा, कोणती पुस्तके वाचली पाहिजेत याबाबत दोन महिन्यात आठ वेळा तज्ञ मान्यवर मोफत मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत. मुलांना वाचनाची विशेष आवड लावण्यासाठी पालकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुलांमध्ये वाचन-लेखनाची अभिरूची वाढविणारे साहित्यिक नरेद्र लांजेवार यांनी केले आहे. त्यासाठी प्रगती सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल पंजाबराव गायकवाड व नरेंद्र लांजेवार यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन प्रगती सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षा अरूणा कुल्ली, आणि पुस्तक मैत्री बालवाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे. सहभागी विद्यार्थ्याला मिळणार प्रमाणपत्रया वाचन अभियानात सहभागी होणाºया प्रत्येक विद्यार्थ्याला प्रमाणपत्र सुद्धा मिळणार आहे. प्रगती वाचनालयाच्या सहकाºयाने अनेक चांगली पुस्तके या मुलांना रोज सकाळी आठ ते दहा व संध्याकाळी ५ ते ७ या वेळात मिळू शकतील. मुले प्रगती वाचनालयात बसून पुस्तके वाचू शकतील किंवा घरीसुद्धा घेऊन जाऊ शकतील.
आदर्श उपक्रम : जेवढी वाचाल पुस्तके, तेवढे मिळणार बक्षीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2019 5:42 PM