गंभीर रुग्णांना व्हेंटिलेटरसह व व्हेंटिलेटरविना देण्यात येणाऱ्या २० पॅकेजखाली उपचार मिळत आहे. कोविडवरील उपचारादरम्यान पॅकेजचा कालावधी संपला व उपचार पूर्ण झाला नसल्यास रुग्णाच्या कुटुंबाचे १़ ५० लक्ष रुपये संपेपर्यंत उपचाराचा कालावधी लांबविता येतो. जर कुटुंबातील सर्व सदस्य रुग्णालयात दाखल असतील व लॉकडाऊन सुरू असल्यास कागदपत्रे सादर करता न आल्यामुळे उपचार थांबणार नाही. अशा परिस्थितीत फोन करूनही उपचार सुरू करता येतो. लॉकडाऊनचा कालावधी संपेपर्यंत लाभार्थी कागदपत्रे सादर करू शकतात. इतर उपचारांसाठी हा कालावधी ७ दिवसांचा राहणार आहे. शिधापत्रिकेचा व्हॉटसॲपवर पाठविलेला फोटोही नोंदणीसाठी स्वीकारला जाणार आहे. कोविडच्या रुग्णाच्या उपचाराचा समावेश योजनेतील पॅकेजमध्ये होत असल्यास व त्याची पूर्वपरवानगी मिळाल्यास कोविड चाचणीचा खर्च पॅकेजमध्ये अंतर्भूत असणार आहे.
या योजनेचा लाभ दोन्ही योजनांच्या अंगीकृत रुग्णालयांमध्ये किंवा कोविड उपचासाठी अंगीकृत केलेल्या रुग्णालयांमध्ये मिळणार असून अधिक माहितीसाठी जिल्हा समन्वयक किंवा विभागीय व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे़
ही आहेत खासगी रुग्णालये
मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल मेहकर, राठोड मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल मेहकर, मेहेत्रे हॉस्पिटल बुलडाणा, संचेती हॉस्पिटल बुलडाणा, सिटी हॉस्पिटल बुलडाणा, तुळजाई हॉस्पिटल, चिखली.