बुलडाणा : नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकर्यांना दिल्या जाणार्या तुटपुंज्या मदतीमध्ये केंद्र शासनाने फेरबदल सुचविले आहेत. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आपत्कालीन फंड अर्थात एनडीआरफच्या सन २0१0 च्या निकषांच्या अनुषंगाने राज्य शासनाने ३0 जानेवारी २0१४ रोजी काढलेल्या अध्यादेशात देण्यात आलेल्या मदतीच्या निकषामध्ये घवघवीत वाढ सुचविणारा अध्यादेश केंद्र शासनाने ८ एप्रिल रोजी काढला आहे. यानुसार शेतकर्यांना हेक्टरी १२ हजार २00 रुपयांची मदत सुचविली आहे, तर घराच्या पडझडीला एक लाख रुपयांचे अनुदान देण्याची शिफारस केली आहे. मृत जनावरांच्या मदतीची र्मयादाही वाढविण्यात आली आहे यामुळे नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या जनसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्राच्या एडीआरएफ चे उपसचिव गौतम घोष यांनी ८ एप्रिल रोजी अध्यादेश जारी केला असून, राज्यांना अंमलबजावणीच्या सूचना दिल्या आहेत. हा आदेश अमरावती विभागीय आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकार्यांना १३ एप्रिल रोजी पाठविला. याबाबत राज्य शासन शिफारस करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामध्ये विविध बदल सुचविण्यात आले आहे. या सूचनांची अंमलबजावणी संपूर्ण राज्यात करण्याचे आदेश गृहविभागाने दिले आहेत. शेतकर्यांना एका एकराला १५ ते २0 हजार रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. अशा स्थितीत जुन्या निकषात शेतकर्यांना अडीच एकराला चार हजार ५00 रुपयांची मदत दिली जात होती. यामध्ये फेरबदल करावे, अशी मागणी शेतकर्यांकडून करण्यात आली होती. पंतप्रधानांनी मदतीसंदर्भात १ एप्रिल रोजी घोषणा केली. त्यानुसार एनडीएफआरने अध्यादेश काढला आहे.
हेक्टरी १२ हजारांच्या मदतीची शिफारस
By admin | Published: April 17, 2015 1:38 AM