कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने सुरू करण्यात आलेल्या मिनी लॉकडाऊनला एक महिना होत आला आहे. मात्र या काळात मायक्रो फायनान्स वसुली थांबत नसल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात महिला बचत गट व इतर काही गरजूंनी मायक्राे फायनान्सकडून कर्ज घेतलेले आहे. महाराष्ट्र शासनाने कोरोना प्रादुर्भाव पाहता १४ एप्रिलपासून कडक निर्बंध सुरू केले. यामध्ये संचारबंदी, अत्यावश्यक सेवासुविधा, त्याही सकाळी ७ ते ११ पर्यंतच सुरू ठेवण्यात येत आहेत. मजूर, किरकोळ व्यावसायिक यांचे संचारबंदीमुळे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दुकाने बंद असल्याने आर्थिक संकट त्यांच्यावर ओढवले आहे. राेजगार गेल्याने अनेक जण बेराेजगार झाले आहेत. त्यातच मायक्राे फायनान्सकडून सक्तीने वसुली करण्यात येत असल्याचे चित्र आहे. मायक्राे फायनान्सचे हप्ते भरण्यासाठी अनेक जण सावकाराकडून कर्ज घेत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे, शासनाने मायक्राे फायनान्सकडून हाेत असलेली सक्तीची वसुली थांबवावी, अशी मागणी हाेत आहे.
लॉकडाऊनमध्येही मायक्राे फायनान्सची वसुली सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2021 4:36 AM