असून याकडे महामंडळाचेही दुर्लक्ष असल्याने प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात असल्याचे चित्र बसस्थानामध्ये उभ्या
असलेल्या बसमध्ये पाहणी केल्यानंतर दिसून आले आहे. आता काही दिवसांनी उन्हाळा सुरु होणार असून उन्हाचा पारा वाढत जाऊन आगीच्या घटनेत वाढ होतात. जिल्ह्यातील सर्वाधिक नागरिक राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसने प्रवास करतात. त्यामुळे बसेसमध्ये अग्निशमन यंत्राची सुविधा आहे की नाही, याबाबत बसेसची पाहणी केली
असता अनेक बसेसमध्ये अग्निशमन यंत्रच नसल्याचे दिसून आले आहे. अग्निशमन यंत्र बसविण्याकडे महामंडळाचेही दुर्लक्ष होत असल्याने प्रवासी लालपरीत आगीच्या धगेवर प्रवास करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अग्निशमन यंत्र बसविण्याची गरज आहे.
प्रथमोपचार पेट्या गायब
लालपरीमध्ये प्रवास करीत असताना कुठे काही अपघात झाला तर प्रवाशांसह चालक-वाहकांवर प्रथमोपचार करण्यासाठी चालकाच्या कॅबिनमध्ये प्रथमोपचार पेट्या बसविण्यात आल्या होत्या. त्या पेट्याही एसटी बसमधून गायब झाल्या आहे. ज्या बसमध्ये प्रथमोपचार पेट्या होत्या, त्यातील साहित्य बेपत्ता झाल्याचे दिसून आले. गेल्या
कित्येक वर्षांपासून बसमध्ये प्रथमोपचार पेट्या नसल्याने प्रवाशांसह चालक-वाहकांचीही सुरक्षा ऐरणी आली आहे.
वायफाय सुविधा नावालाच
अँड्रॉईड मोबाईलच्या युगात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मनोरंजन व्हावे, याकरिता प्रत्येक बसेसमध्ये वाय-फाय यंत्रणा बसविण्यात आली होती. याचा कंत्राट एका खासगी कंपनीकडे होता. परंतु, वर्षभरातच यंत्रणेचा बोजवारा उडाला. बसेसमधील ही सुविधा बंद झाली असून काही बसेसमध्ये केवळ बॉक्स पहायला मिळत आहे. त्यामुळे मनोरंजनाकरिता असलेले साधन अल्पावधीतच हिरावल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे. एसटीतील वायफाय सुविधा नावालाच आहे.
आगारात आओ जावो घर तुम्हारा
बुलडाणा येथील एसटी महामंडळाच्या आगारात लोकमत प्रतिनधी गेले असताना कोणी हटकले नाही. येथील आगारामध्ये आओ जावो घर तुम्हारा असाच प्रकार सुरू आहे.
एसटीची आतून दुरवस्था
बसस्थानकामध्ये उभ्या असलेल्या दोन एसटींची पाहणी केली असता आतून दुरवस्था झाल्याचे दिसून आले. यातील काही बसेसचे तर आसनच तुटलेले होते. काहींच्या खिडक्या तुटलेल्या अवस्थेत दिसून आल्या. एम. एच. ४०. एन. ८९४७ क्रमांकाच्या बसेसचे आसन तुटलेले व खाली पडलेले होते. एम. एच. ४०. ८८५२ क्रमांकाच्या बसेसचे आसन व खिडकी तुटलेली होती.