--खासगी केंद्रे वाढवावी लागणार--
१८ वर्षांवरील व्यक्तींसाठी १ मेपासून लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. प्रारंभी ही लसीकरण मोहीम खासगी लसीकरण केंद्रांवर (सीव्हीसी) राबविण्यात येणार आहे. त्यानुषंगाने बुलडाणा जिल्ह्यात या खासगी लसीकरण केंद्रांची संख्या वाढवावी लागणार आहे. सध्या जिल्ह्यात १६ खासगी केंद्रांवर लसीकरण करण्यात येत आहे. या केंद्रांची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा टास्क फोर्सची बैठक होणार असून त्यामध्ये नेमकी किती केंद्रे वाढविण्यात येणार आहेत, याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.
--ऑन दी स्पॉट नोंदणी नाही--
या लसीकरण मोहिमेसाठी ऑनलाइन नोंदणी अनिवार्य राहणार आहे. सध्या सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत आन दी स्पॉटही नोंदणी करून लगेच लस घेता येते. मात्र ही सुविधा १ मेपासून सुरू होणाऱ्या लसीकरणाच्या मोहिमेत उपलब्ध राहणार नसल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले आहे.