शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करून नुकसान टाळावे
देऊळगाव राजा : तालुक्यात ई-पीक पाहणी कार्यक्रम राबवण्यास सुरुवात झाली आहे. या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी ॲप डाऊनलोड करून त्यावर आपल्या शेतातील गट नंबरमध्ये ज्या खरीप पिकाची लागवड केली आहे, त्याची नोंदणी करावी व हाेणारे नुकसान टाळावे, असे आवाहन तहसीलदार डॉ. सारिका भगत यांनी १५ सप्टेंबर रोजी केले आहे.
ओबीसी आंदाेलनासाठी भाजपचे आंदाेलन
माेताळा : ओबीसी विरोधी महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाचा विश्वास घात केल्याचा आराेप करीत भाजपच्या वतीने माेताळा येथे आंदाेलन करण्यात आले. तसेच विविध मागण्यांचे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले़
अनुकंपाधारक उमेदवरांची निवड यादी प्रसिद्ध
बुलडाणा : अनुकंपा तत्त्वावर उमेदवारांकडून अर्जाची सुधारित अंतिम ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही ज्येष्ठता यादी अनुकंपाधारक उमेदवारांना १२ जुलै ते १३ ऑगस्ट २०२१ या कालावधीत मूळ शैक्षणिक कागदपत्रे तपासणी करण्यात आली. या उमेदवारांची यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
अमडापूर परिसरात गुरे चाेरणारी टाेळी सक्रिय
अमडापूर : परिसरात गत काही दिवसांपासून गुरे चाेरणारी टाेळी सक्रिय असल्याचे चित्र आहे. विशेषत: शेळ्या चाेरटे लंपास करीत असल्याने पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याकडे पाेलिसांनी लक्ष देऊन चाेरट्यांचा बंदाेबस्त करण्याची मागणी हाेत आहे़
नवीन साेयाबीनला मिळाला ११ हजारांचा भाव
बुलडाणा : कृषी उत्पन्न बाजार समितीत साेयाबीन खरेदीस १५ सप्टेंबर राेजी शुभारंभ करण्यात आला़ पहिल्याच दिवशी साेयाबीनला ११ हजार १११ रुपयांचा भाव मिळाला आहे़ यावेळी शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.