- सदानंद सिरसाट लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांची रक्कम लवकर मिळावी, यासाठी चालू वर्षात कापूस विक्री प्रक्रीया लवकरच पूर्ण केली जाणार आहे. शेतकऱ्यांनी आॅक्टोबरपूर्वीच नोंदणी केल्याने (भारतीय कापूस महामंडळ) सीसीआयकडून खरेदी प्रक्रीयेला सुरूवात केली जाईल, बाजार समित्यांमध्ये शेतकºयांची नोंदणी होणार असल्याने खामगाव बाजार समितीकडून येत्या दोन दिवसात निर्णय घेतला जाणार आहे. तसेच नोंदणीसाठी वेबसाईटही तयार केली जात आहे. मोबाईलद्वारेही त्यावर शेतकºयांची नोंदणी होणार आहे.चालू वर्षाच्या हंगामासाठी शासनाने कापसाची आधारभूत किंमत लांब धाग्यासाठी ५ हजार ८२५ तर मध्यम धाग्यासाठी ५ हजार ५१५ रुपये निश्चित केली आहे. आधारभूत किंमतीमध्ये वाढ झाल्याने सीसीआयला किमान आधारभूत किंमत योजनेखाली मोठ्या प्रमाणात कापसाची खरेदी करावी लागणार आहे. कापूस घरात आल्यानंतर त्याची महाराष्ट्र कापूस पणन महासंघ किंवा सीसीआयला विक्री करण्यासाठी नोंदणीची पद्धत गेल्या काही वर्षात पुढे आली आहे. त्यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होणे, तसेच उशिरा नोंदणी केलेल्या शेतकºयांना ताटकळत राहावे लागणे, यासारखे प्रकार सातत्याने घडले. हा प्रकार यावर्षी घडू नये, यासाठी कापूस शेतकºयांनी विक्रीसाठीची नोंदणी आॅक्टोबरपूर्वीच करावी, असा आदेश शासनाने दिला. त्यानुसार अनेक बाजार समित्यांमध्ये सप्टेंबरच्या दुसºया आठवड्यापासूनच नोंदणीला सुरूवात झाली.खामगाव बाजार समितीमध्ये शासनाच्या आदेशानुसार कराव्या लागणाºया उपाययोजनांबाबत दोन दिवसात बैठक घेतली जात आहे.पीक पेºयाचा सात-बारा लागणारकापूस विक्रीच्या नोंदणीसाठी चालू वर्षाचा कापूस पीक पेºयासह सात-बारा, आधार कार्ड, पॅन कार्ड, आयएफएससी कोड असलेल्या बँक पासबुकची झेरॉक्स, मोबाईल क्रमांक नोंदणीकरिता आवश्यक आहेत.
शासन आदेशानुसार उपाययोजना करण्यासाठी समितीमध्ये बैठक घेतली जात आहे. त्यामध्ये केलेल्या नियोजनानुसार वेबसाइटची निर्मिती व पुढील खरेदी प्रक्रीयेची पद्धत निश्चित होणार आहे.- ओ.एस.साळुंके,प्रशासक, कृउबास, खामगाव.