- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्क खामगाव: निम्म ज्ञानगंगा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात गेल्याने खामगाव तालुक्यातील दिवठाणा या गावाचे पुनर्रवसन करण्यात आले. दिवठाणा येथील लाभार्थ्यांना काळेगाव रोडवर राहण्यासाठी भुखंड देण्यात आले. मात्र, याठिकाणी कोणत्याही मुलभूत सुविधा उपलब्ध न केल्यामुळे लाभार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. केवळ कागदोपत्री सुविधा देण्यात आल्याने पुनर्वसन झालेल्या ठिकाणाचे स्थळ निरिक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे.निम्न ज्ञानगंगा-२ बृहत पाटबंधारे योजनेतंर्गत दिवठाणा येथील प्रभावित नागरिकांचे काळेगाव रस्त्यावर पुनर्रवन करण्यात आले. मात्र, याठिकाणी मुलभूत सुविधांचा अभाव आहे. परिणामी, दिवठाणा येथील लाभार्थ्यांचा या ठिकाणी पुनर्रवसनास विरोध होत आहे. पाटबंधारे विभागाच्या सहाय्यक अभियंत्यांनी वरिष्ठ तसेच जिल्हा प्रशासनाची दिशाभूल करून लाभार्थ्यांच्या पुनर्रवसनाचा प्रयत्न केला आहे. लाभार्थ्यांची दिशाभूल करीत काही जणांना स्थलांतरीत केले आहे. या लाभार्थ्यांना मुलभूत समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये संतापाची लाट उमटली आहे.
लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी!येथील अतिक्रमकांना ई-क्लास गट ६८ वरील भुखंडाचे हक्क/ ताबा सक्षम अधिकाºयांमार्फत देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात याठिकाणी वीज, पथदिवे, रस्ते आणि पिण्याचे पाणीही उपलब्ध नाही. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे.
दिवठाणा गावाचे पुनर्रवसन अतिशय चुकीच्या ठिकाणी करण्यात आले आहे. पाटबंधारे विभागाच्या सहा. अभियंत्यांनी वरिष्ठ तसेच चुकीचे अहवाल सादर केले आहे. कागदोपत्री अहवाल आणि प्रत्यक्षात बरीच तफाव आहे. त्यामुळे पनर्रवसन झालेल्या ठिकाणाचे वरिष्ठ स्तरावरून स्थळ निरिक्षण व्हावे.- सुभाष वाकुडकर,माजी, सरपंच दिवठाणा.