लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : सन २0१७-१८ साठी आंबिया बहार व गारपीटमध्ये पुर्नरचित हवामान आधारित फळपीक विमा योजना जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये ही योजना संत्रा, मोसंबी, केळी, द्राक्ष, आंबा, पेरू, डाळिंब व लिंबू या फळपिकांकरिता राबविण्यात येणार आहे. योजनेंतर्गत फळपीकनिहाय विमा संरक्षण रक्कम शासनाने मंजूर केलेली आहे. ही योजना राज्यात ३0 जिल्ह्यांतील २८७ तालु क्यांमधील १५0७ महसूल मंडळांत राबविण्यात येणार आहे.ही योजना कर्जदार शेतकर्यांना सक्तीची असून, बिगर कर्जदार शेतकर्यांना ऐच्छिक आहे. योजना चार समूहांमध्ये राबविण्यात येणार आहे. समूह एकमध्ये इफको टोकियो जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेड, समूह दोन व तीनमध्ये एचडीएफसी इर्गो जनरल इन्श्युरन्स कंपनी व समूह चारमध्ये बजाज अलायन्झ जनरल इन्श्युरन्स कंपनीमार्फत राबविण्यात येणार आहे. शेतकर्यांना विमा हप्ता दर संरक्षित रकमेच्या पाच टक्के किंवा वास्तवदश्री दर यापैकी कमी असलेली रक्कम शेतकर्यांनी भरावयाची आहे. उर्वरित विमा हप्ता केंद्र व राज्य शासन समप्रमाणात अदा करणार आहे. आंबिया बहारातील मोसंबी, केळी, पेरू, डाळिंब या पाच फळ िपकांसाठी शेतकर्यांनी विमा प्रस्ताव बँकांकडे ३१ ऑक्टोबरपर्यंं त सादर करावयाचे आहे. तसेच द्राक्ष फळपिकाकरिता १५ ऑ क्टोबर, लिंबूकरिता १४ नोव्हेंबर, आंबा फळ पिकासाठी ३१ डिसेंबर, तर संत्रा व काजू फळपिकाकरिता ३0 नोव्हेंबरपर्यंंत प्रस्ताव बँकांना सादर करावयाचे आहेत. योजनेनुसार कमी जास् त पाऊस, वेगाचा वारा, गारपीट व सापेक्ष आद्र्रता या हवामान धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकर्यांना विमा संरक्षण आणि आर्थिक साहाय्य देण्यात येते. शेतकर्यांनी जास् तीत जास्त संख्येने या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.याबाबत तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, नजीकच्या बँक शाखेशी व संबंधित विमा कंपनीशी संपर्क साधावा, शेतकर्यांनी अंतिम मुदतीची वाट न बघता जास्तीत जास्त प्रमाणात या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 12:20 AM
बुलडाणा : सन २0१७-१८ साठी आंबिया बहार व गारपीटमध्ये पुर्नरचित हवामान आधारित फळपीक विमा योजना जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये ही योजना संत्रा, मोसंबी, केळी, द्राक्ष, आंबा, पेरू, डाळिंब व लिंबू या फळपिकांकरिता राबविण्यात येणार आहे. योजनेंतर्गत फळपीकनिहाय विमा संरक्षण रक्कम शासनाने मंजूर केलेली आहे. ही योजना राज्यात ३0 जिल्ह्यांतील २८७ तालु क्यांमधील १५0७ महसूल मंडळांत राबविण्यात येणार आहे.
ठळक मुद्देकेळी, पेरू, डाळिंब फळपिकांसाठी अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरयोजनेंतर्गत फळपीकनिहाय विमा संरक्षण रक्कम शासनाने मंजूर केलेली आहे