लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेड राजा : तीर्थक्षेत्र साखरखेर्डा येथील श्री जगद्गुरू पलसिद्ध शिवाचार्य महास्वामींचा ९५९ वा स्मृती महोत्सव १0 ऑगस्टपासून सुरू होत असून, तीन दिवस धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल राहणार आहे.साखरखेर्डा परिसरातील दंडकारण्यात ऋषी मुनींचे वास्तव्य असायचे. आजही या अरण्यात हेमाडपंतीय मंदिरे पहावयास मिळतात. उज्जैनी धर्मपीठाचे जगद्गुरु श्री पलसिद्ध महास्वामी धर्म प्रचाराची पताका खांद्यावर घेऊन भ्रमण करीत असताना साखरखेर्डा येथे स्थायिक झाले आणि ९५९ वर्षांपूर्वी श्रावण चतुर्थीला श्री पलसिद्ध महास्वामींनी दंडकारण्यात संजीवन समाधी घेतली. त्यांनी सुरू केलेल्या धर्मप्रचार आणि प्रसार आजही या समाधी स्थळावर अव्याहतपणे सुरू आहे. मठाचे मठाधिपती सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्या अधिपत्याखाली मठाच्या विकास कामाचे पर्व खर्या अर्थाने सुरू झाले. या पलसिद्ध संस्थानला तीर्थक्षेत्राचा ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त झाला. या संस्थानच्यावतीने मागील १0 वर्षांच्या काळात सर्वधर्म संमेलन, सामूहिक विवाह, धार्मिक, अध्यात्मिक कार्यक्रमाची मोठय़ा प्रमाणात रेलचेल राहते. १0 ऑगस्टपासून स्मृती महोत्सवाला प्रारंभ होत असून, गुरुवारला सकाळी ६ वाजता नामस्मरणास प्रारंभ, दुपारी १२ वाजता शिवदीक्षा संस्कार विधी आणि येणार्या दिंड्यांचे स्वागत. सायंकाळी दिंड्यासह पालखी मिरवणूक, रात्री ८ वाजता शिवभक्त बबनअप्पा कौसडीकर यांचे कीर्तन, रात्री १0 वाजता शिवभजन, शुक्रवारला श्रावण कृ. चतुर्थीला सकाळी ६ वाजता नामएक्का समाप्ती, सकाळी ७ वाजता श्रींच्या मूर्तीस रुद्राभिषेक व महापूजा, सकाळी १0 वाजता शि.भ.प. काशिनाथ नागठाणे यांचा संगीतमय कार्यक्रम, ११.३0 वाजता शिवाचार्यरत्न सद्गुरु सिद्धलिंग शिवचार्य महाराज यांच्या अध्यक्षतेखाली धर्मसभा होणार आहे. यावेळी सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरा, दिगांबर शिवाचार्य महाराज वसमत, शिवशंकर शिवाचार्य महाराज नेरपिंगळाई, बसवलिंग शिवाचार्य महाराज हदगाव, मरुळसिद्ध शिवाचार्य महाराज कारंजा, वेदमूर्ती कैलासलिंग स्वामी तळेगाव यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. महामंडलेश्वर मनीषानंद पुरी महाराज यांचे प्रवचन. दुपारी ४ वाजता महाप्रसाद, रात्री ८ वाजता सोनबा गुरुजी शिराळे यांचे कीर्तन, शनिवारला सकाळी ७ वाजता रुद्राभिषेक, सकाळी ९ वाजता मन्मथअप्पा खके यांचे कीर्तन, ११ वाजता धर्मसभा, गुरुवर्यांचे अशीर्वचन आणि खा. प्रतापराव जाधव, आ.डॉ. शशिकांत खेडेकर, आ.राहुल बोंद्रे, चिखलीच्या नगराध्यक्ष प्रिया बोंद्रे, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, पंडित शिवाप्पा खके गुरुजी यांची उपस्थिती लाभणार आहे. या स्मृती महोत्सवासाठी वेदमूर्ती नीळकंठ स्वामी, नागेश स्वामी, जितकर, उमेश गंभीरे, गुंडाप्पा स्वामी, सोमनाथ स्वामी परिश्रम घेत आहेत.
साखरखेर्डा येथे धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 12:38 AM
सिंदखेड राजा : तीर्थक्षेत्र साखरखेर्डा येथील श्री जगद्गुरू पलसिद्ध शिवाचार्य महास्वामींचा ९५९ वा स्मृती महोत्सव १0 ऑगस्टपासून सुरू होत असून, तीन दिवस धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल राहणार आहे.
ठळक मुद्देश्री पलसिद्ध महास्वामींचा ९५९ वा स्मृती महोत्सवस्मृती महोत्सव १0 ऑगस्टपासून