लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : आरोग्य विभागाकडून जिल्ह्यात दोन टप्प्यामध्ये जंतनाशक मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचा दोन दिवसामध्ये अहवाल येणार आहे. त्यानंतर मोहिमेतून सुटलेल्या बालकांनाही जंतनाशक गोळ्या पुरवण्यात येणार असल्याची माहिती माता व बालसंगोपण अधिकारी डॉ. रविंद्र गोफणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.जंत निवारणासाठी जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून जंतनाशक मोहिम हाती घेण्यात आली. सुरूवातीला राष्ट्रीय जंतनाशक दिन ८ आॅगस्ट रोजी १ ते १९ वर्ष वयोगटातील मुलांना जंतनाशक गोळी देवून ही मोहिम राबविण्यात येणार आहे. या दिवशी जे लाभार्थी सुटले त्यांना १६ आॅगस्ट रोजी मॉपअप दिनाच्या दिवशी गोळ्या देण्यात आल्या आहेत. या दोन्ही दिवसांमध्ये किती लाभार्थी मुलांना गोळ्या देण्यात आल्या याची संख्या अद्याप आरोग्य विभागाकडे आलेली नाही.जंतनाशक मोहीम राबविण्यासाठी जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागाबरोबरच शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण विभागाचा संयुक्त सहभाग होता. त्यानुसार जिल्हा परिषद, शाळा, हायस्कुल, पालिकांच्या शाळा, अंगणवाडी याठिकाणी मुलांना गोळ्या वाटप करण्यात आल्या.दरम्यान, गोळ्या वाटपाच्या दिवशी गैर हजर राहणाऱ्या मुलांसाठी ही मोहिम नावालाच ठरल्याची चर्चा आहे. गैर हजर असलेल्या मुलांनाही जंतनाशक गोळ्यांचे वितरण करण्यात यावे.
जंतनाशक मोहिमेचा दोन दिवसात स्पष्ट होणार अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 3:08 PM