बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असून शुक्रवारी आणखी ६० जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. ९३५ काेराेना अहवाल निगेटिव्ह आले असून, २४ जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ९९५ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ९३५ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, ६० अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत.
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये बुलडाणा शहरातील १३, जळगाव जामोद शहर २, दे. राजा शहर २, चिखली शहर ८, चिखली तालुका : केळवद १, खामगाव शहर १६, खामगाव तालुका घाटपुरी १, टेंभुर्णा १, वझर १, निपाणा १, पळशी १, शेगाव तालुका जानोरी १, शेगाव शहर ८, मोताळा तालुका खरबडी १, संग्रामपूर शहर २ आणि मूळ पत्ता अकोला असलेली एक व्यक्ती पॉझिटिव्ह आली आहे.
तसेच काेराेनावर मात केल्याने खामगाव येथील केंद्रातून ६, बुलडाणा अपंग विद्यालयातील २, स्त्री रुग्णालय ४, दे. राजा २, संग्रामपूर २, शेगाव ५ तसेच मोताळा येथील तिघांना सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत १ लाख १६ हजार ९१२ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत १३ हजार ३८७ कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. २०३० स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण १३ हजार ८५२ कोरोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी १३ हजार ३८७ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रुग्णालयात २९८ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत १६७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.