लोणार : एन.टी.(ड) व एन.टी.(क) प्रवर्गातील विद्यार्थ्यांची अकरावी, बारावीची शिष्यवृत्ती त्वरीत मिळण्यासाठी तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेतर्फे तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. गेल्या दोन वर्षापासून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रोखून धरली आहे. अद्याप शिष्यवृत्तीची रक्कम त्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. प्रामुख्याने एन.टी.(ड) व एन.टी.(क) या प्रवर्गाची शिष्यवृत्ती थकली आहे. अगोदरच शेतकरी पालक कर्जामुळे व गारपिटीने हवालदिल झालेला आहे. शेतकरी पाल्यांना अद्यापही शासनदरबारी न्याय मिळत नाही. विद्यार्थ्यांच्या हक्काची शिष्यवृत्ती मिळालीच पाहिजे, अन्यथा राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरेल, असा इशारा देण्यात आला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष किशोर मापारी, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.विक्रांत मापारी, तालुकाध्यक्ष सदानंद पाटील तेजनकर, गजेंद्र नागरे, इमरान, विठ्ठल जाधव, डॉ.भास्कर मापारी, गणेश मापारी, सै.उमर शे.हुसेन, प्रशांत साबळे, दीपक खरात, पंकज सरदार, शे.रफीक शे.गफ्फार, मोसीन शाह, शेख इकबाल, शुभम सिरसाट, नागेश मापारी यांचेसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
शिष्यवृत्तीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे तहसिलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 1:26 PM
लोणार : एन.टी.(ड) व एन.टी.(क) प्रवर्गातील विद्यार्थ्यांची अकरावी, बारावीची शिष्यवृत्ती त्वरीत मिळण्यासाठी तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेतर्फे तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.
ठळक मुद्दे गेल्या दोन वर्षापासून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रोखून धरली आहे. प्रामुख्याने एन.टी.(ड) व एन.टी.(क) या प्रवर्गाची शिष्यवृत्ती थकली आहे. विद्यार्थ्यांच्या हक्काची शिष्यवृत्ती मिळालीच पाहिजे, अन्यथा राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरेल, असा इशारा देण्यात आला.