लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : आदिवासी विकास विभागाच्या अधीनस्थ आश्रमशाळा, शासकीय वसतिगृह, एकलव्य निवासी शाळा, अनुदानित आश्रमशाळा, शासकीय वसतिगृह आणि नामांकित शाळांमध्ये इयत्ता पाचवी ते आठवी वर्ग सुरू होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमाचे काटेकोर पालन करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. इयत्ता नववी ते बारावीपर्यंत २३ नोव्हेंबर २०२० पासून वर्ग सुरू झाले असले तरी आदिवासी पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्यासाठी फारसा उत्साह दाखविला नाही. त्यामुळे आश्रमशाळा सुरू होऊनही नववी ते बारावीच्या वर्गात अत्यल्प पटसंख्या दिसून आली. आता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचे निर्देश जारी झाल्यामुळे ‘ट्रायबल’चा शिक्षण विभागापुढे कोरोना नियमावलीचे पालन करून निवासी शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांपुढे अध्यापन करणे आव्हानात्मक ठरणारे आहे. गर्दी होणार नाही, याची काळजी शाळांचे शिक्षक, मुख्याध्यापकांना घ्यावी लागणार आहे.
निवासी शाळांची घंटा १५ फेब्रुवारीपासून वाजणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2021 10:42 AM