लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: बदलते हवामान,पीक पद्धतीतील बदल तथा शेतीमध्ये अधुनिक तंत्रज्ञााचा वापर करून उत्पन्न वाढीसाठी तथा नाविन्यपूर्ण प्रयोग करून कृषी क्षेत्राचा कायापालटासाठी प्रयत्न करणाºया राज्यातील ३,५०० प्रगतीशील शेतकऱ्यांची ‘रिसोर्स बँक’ तयार करण्यात आली असून त्याचा ग्रामपातळीवरील शेतकºयांना लाभ व्हावा यादृष्टीने शासन प्रयत्न करीत आहे. बुलडाणा जिल्ह्यातीलही ११७ शेतकºयांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी बुलडाणा येथे २९ आॅगस्ट रोजी दिली.पोकरा योजनेच्या अंमलबजावणीची मंद असलेली गती वाढवून महिनाभरात कामाची गुणवत्ता वाढविण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आढावा बैठक घेतली. रात्री उशिरा पर्यंत चाललेल्या या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.राज्यातील अनेक शेतकरी वैयक्तिकस्तरावर शेतीमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतात. त्यातून शेती उत्पादन वाढवून सामाजिक हिताच्या दृष्टीने अनेकांचे प्रयत्न असतात. वर्तमान स्थितीत बेभरवशाचे झालेल्या हवामानामुळे पीक पद्धतीतही काही शेतकºयांनी बदल केले आहे. मात्र त्याची व्यापकता ही मर्यादीत स्वरुपात राहत आहे. ती वाढावी व प्रत्येक शेतकºयापर्यंत त्याची माहिती पोहोचावी, यासाठी ‘शेतकºयांची रिसोर्स बँक’ कार्यरत राहील. या माध्यमातून कृषी क्षेत्रातील ज्ञान, अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी यांच्यामधील समन्वय व संवाद वाढावा यादृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचे ते म्हणाले.दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातूनही या रिसोर्स बँकेसाठी ११७ शेतकºयांची नावे राज्यस्तरावर पाठविण्यात आली आहे. त्याचा जिल्ह्यातील शेतकºयांना लाभ होण्यास मदत मिळणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतंर्गतही जिल्ह्यात चांगले काम झाले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कर्जमाफी मध्ये बँकांना मिळालेल्या रकमेचा अधिकाधीक शेतकºयांना पीक कर्ज वाटप करण्यासाठी प्रयत्न करावा, असे त्यांनी सांगितले. खा. प्रतापराव जाधव यांनीही पोकरा योजनेतील कामे गांभीर्याने पुर्ण करावीत, अशा सुचना दिल्या.
३,५०० प्रगतीशील शेतकऱ्यांची रिसोर्स बँक तयार - कृषीमंत्री दादाजी भुसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 11:18 AM