शिबिराचे उद्घाटन मठाचे मठाधिपती सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य राम जाधव हे होते. यावेळी ठाणेदार जितेंद्र आडोळे, अनिकेत सैनिक स्कूलचे अध्यक्ष अर्जून गवई, माजी कृषी सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य दिनकरराव देशमुख, सरपंच दाऊतसेठ कुरेशी, माजी पंचायत समितीचे सदस्य नारायण खरात, युवासेना जिल्हा उपप्रमुख संदीप मगर, ग्राम पंचायत सदस्य सय्यद रफीक, शेख युनूस, शिवसेना उपतालुकाप्रमुख अनंता शेळके, लखन रामावत उपस्थित होते. प्रवीण शिंगणे आणि विद्या शिंगणे या दाम्पत्यांनी रक्तदान करून शिबिराचा शुभारंभ केला. सुमेध सुनील गवई यांनी रक्तदान करून आपला वाढदिवस साजरा केला. या तिघांचेही स्वागत जिल्हा परिषद सदस्य राम जाधव यांनी केले.
अनिकेत सैनिक स्कूलचे मोलाचे योगदान
आजच्या शिबिरात अनिकेत सैनिक स्कूलचे विद्यार्थी गणेश राजू खंडारे, अक्षय सुनील जाधव, विष्णू प्रल्हाद निकम, गणेश राजेंद्र डोईफोडे, सचिन कृष्णा कड, अर्जून रामभाऊ वानखेडे, मंगेश अंबादास बारशे, योगेश गैबी कायंदे, शोएबखान अहमदखान, अमित सुरेश गवई, गजानन ज्ञानेश्वर गायकवाड, ज्ञानेश्वर मारोती उबाळे, रीतेश रमेश उबाळे या युवकांनी रक्तदान केले. तर अनंता पाटीलबुवा शेळके, लखन रामावत, अजय पोधाडे, राहुल गवई, सचिन खंडारे यांनी भाग घेऊन रक्तदान केले.