आपला लाडक्या गणरायाचे आपल्याच दारी विसर्जन व्हावे, यासाठी चार ट्रॅक्टरद्वारे घरपोच गणेश विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. यात ट्रॅक्टरसमोर घंटागाड्यातून निर्माल्यही गोळा करण्यात आले. ग्रामपंचायतीने बनवलेल्या घाटातून गणेशमूर्त्यांचे विसर्जन करण्यात आले. कोरोना काळामध्ये गर्दीमधून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ शकतो. या कारणाने शासनाने प्रयत्न करून गणेशोत्सव हा आरोग्य उत्सव व्हावा, या अनुषंगाने उपायोजना केल्या. यातच गणेश विसर्जनासाठी गर्दी होऊ नये, म्हणून डोणगाव ग्रामपंचायतने कोरोनाकाळात ‘आपले गणेश विसर्जन आपल्या दारी’ हा उपक्रम राबवला. यातच गणेश विसर्जन वेळी निघणारे निर्माल्य हेसुद्धा वेगळे जमा करून त्यापासून कम्पोस्ट खत तयार करण्यात येणार आहे. गणेश विसर्जन आपल्या दारी या उपक्रमात ग्रामस्थांनी चांगला सहभाग नोंदवला. चार ट्रॅक्टरद्वारे बनवण्यात आले गणेश घाट हे संपूर्ण गावात फिरून त्यांनी रीतसर आरती करून ट्राॅलीमध्ये लावलेल्या गणेश घाटात विसर्जन केले. केलेल्या मूर्ती या नदीवर बांधलेल्या कट्ट्यात प्रवाहित करण्यात येणार असून, ज्याने जलप्रदूषण सुद्धा होणार नाही.
210921\new doc 2021-09-21 16.01.38_1.jpg
विसर्जन