जिल्ह्यात मार्चमध्ये जिल्हास्तरावर काही निर्बंध लादण्यात आले होते. त्यानंतरही बुलडाणा जिल्ह्यात मार्च महिन्यात १९ हजार ७६ व्यक्ती बाधित आढळून आल्या होत्या, तर सक्रिय रुग्णांची संख्या ५,४९४ होती. ६७ मृत्यू झाले होते. त्यानंतर एप्रिल महिन्यात २६ हजार १४५ कोरोनाबाधित आढळून आले. सक्रिय रुग्णांची संख्या ६,८७८ होती, तर १५० जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मे महिन्यातही कोरोनाचे संक्रमण जिल्ह्यात सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन निर्बंधांची कठोरता वाढविणार असल्याचे संकेत आहेत.
--८ दिवसांत ५,९२३ बाधित--
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात ५,९२३ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत, तर ५९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ५,१९४ सक्रिय रुग्ण आहेत. सोबतच ७७३४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. हे चित्र कठोर निर्बंध लावण्याच्या दृष्टीने बोलके आहे.