लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : गुरुवार १ जून रोजी पहाटेच्या सुमारास वळिवाच्या सरी कोसळल्याने जून महिन्याचे स्वागत पावसाने झाल्याचे सुखद चित्र खामगाव परिसरात दिसून आले.जून महिन्यापासून पावसाळा सुरू होत असल्याचे मानले जाते. सर्वाधिक तीव्र उन्हाचा मे महिना बुधवारी संपला व गुरुवारी जूनच्या पहिल्याच दिवशी वळिवाच्या पावसाने हजेरी लावली. खामगाव शहरासह परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे वातावरणात काही काळ गारवा पसरला होता. दुपारनंतर पुन्हा उकाड्यात वाढ झाली; मात्र जून या पावसाळ्याच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवसाची सुरुवात पावसाने झाली आहे.
जूनच्या स्वागताला वळिवाच्या सरी!
By admin | Published: June 02, 2017 1:07 AM