बुलडाणा: मागील सहा वर्षात मत्सव्यवसायाच्या माध्यमातून बुलडाणा जिल्ह्यातून शासनाच्या तजोरीत २ कोटी ५२ लाख रूपयाचा महसूल जमा झाला. यामध्ये जिल्ह्यातील तलावाचा ठेका, मत्सबीज विक्री आणि इतर संकीर्ण वसूलीचा समावेश आहे. बुलडाणा जिल्ह्यात मत्स्य व्यवसाय करणार्या १७0 संस्था नोंदणीकृत आहेत. यापैकी काही संस्था बंद पडल्या असून जेमतेम संस्था सुरू आहेत. अनेक संस्था तर नाममात्र कागदावर कार्यरत आहे. जिल्ह्यात ४८३ तलाव आहेत. यामध्ये पाटबंधारे विभागाचे १0२, जिल्हा परिषदेचे ३३१, ग्रमापंचायतीचे ४७ आणि नगर परिषदेच्या ३ तलावाचा समावेश आहे. यावर्षी पावसाला उशीरा सुरूवात झाली असली तरी सुरूवातीच्याच पावसाने बहुतेक तलाव शंभरटक्के भरले होते. त्यामुळे यावर्षी सुध्दा मत्सव्यवसाय बर्यापैकी आहे. मागील २00९-२0१0 ते २0१४-१५ या सहा वर्षात २ कोटी ५२ लाख ७२ हजार ८७५ रुपयाचा महसुल शासनाला मिळाला. यामध्ये जिल्ह्यात असलेले तलावाच्या ठेक्याच्या माध्यमातून २ कोटी १८ लाख ५६ हजार रुपये तर मत्सबीज विक्रीपासून ३३ लाख १६ हजार १९७ रुपये आणि इतर संकीर्ण वसुलीचे ९९ हजार ९६४ रुपयाचा महसुल जमा झाला आहे. यापूर्वी मत्स्य व्यवसाय संस्थाना तलावात बीज सोडण्यासाठी शासनाकडून ३३ टक्के अनुदान दिले जात होते. मात्र, हे अनुदान बंद करण्यात आल्याने संस्था डबघाईस आल्या आहेत. संस्थांना स्वत:कडील आर्थिक भांडवल लावून बीज खरेदी करावी लागत असल्याने चांगलीच दमछाक होत आहे.
मत्सव्यवसायाच्या माध्यमातून २ कोटीचा महसुल
By admin | Published: December 26, 2014 12:00 AM