फहीम देशमुख / शेगावशेगाव आणि बाळापूर येथील तहसीलदारांनी रेती चोरट्यांविरोधात रात्री-बेरात्री करवाई सुरू केली असताना याच अधिकार्यांचे कर्मचारी खुलेआम रेती चोरी करणार्या वाहनधारकांकडून कारवाईच्या नावाखाली दररोज हजारो रुपयांची वसुली करीत असल्याची बाब लोकमत ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघडकीस आली आहे.वेळ सकाळी साडेपाचची.. शेगाव शहराबाहेर बाळापूर येथील रेती चोरी करणार्यांविरुद्ध कारवाई करणारे पथक रस्त्यावर उभे राहून वाहने थांबवित असल्याची माहिती मिळताच.. लोकमतची चमू वाहनमालक बनून घटनास्थळी पोहोचतात.. आणि मग सुरु होते देवाण- घेवाणीची प्रक्रिया.. यामध्ये चमूने बोलणी सुरु केल्यानंतर तीन गाड्यांचे प्रत्येकी पंधरा हजार रुपये प्रमाणे मागणी केली आणि पैसे नसतील तर पो.स्टे. ला गाड्या लावतो, अश्या धमक्या दिल्या. चमूने आधी १0 हजारमध्ये निपटून घ्या, अशी विनवणी केली; मात्र दोन्ही अधिकार्यांवर कुठलाही फरक न पडल्याने १५ हजारा प्रमाणे तिन्ही गाड्यांचे पैसे त्यांना देण्यात आले. ही हद्द तर शेगावची आहे, असे म्हटल्यानंतर सदर अधिकार्यांना थोडी शंका आली; मात्र हद्द कोणतीही असो, पैसे द्यायचे असेल तर सांगा, नाही तर गाड्या अकोला जिल्ह्यात घेऊन चला, असे सुनावले. उल्लेखनीय म्हणजे सदर व्यवहारासाठी त्यांनी एका खासगी वाहनाचा उपयोग केला गेला. या सर्व प्रकारात रेती चोरी करणार्या वाहनांना हप्ते दिल्यानंतर सर्रास सोडून दिल्या जात असल्याचे आणि पैशांसाठी जिल्ह्याची हद्द सोडून इतर ठिकाणीही वसुली केल्या जात असल्याचे उघडकीस आले.
रेती तस्करांना महसूल कर्मचा-यांचे अभय
By admin | Published: January 02, 2015 12:43 AM