मेहकर : खत दरवाढ मागे घ्या; अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते विनोद बोरे यांनी तहसीलदार संजय गरकल यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
कोराना संकटकाळात व्यापारी जसे संकटात आले, तसेच शेतकरीसुद्धा आर्थिक संकटात आले आहेत. याची जाणीव अनेकांना आहे; परंतु असे असतानाही केंद्र सरकारने खतांच्या दरवाढीत प्रचंड वाढ केली आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड हैराण झाले आहेत. सोयाबीनची विक्री लाखो शेतकऱ्यांनी खूप कमी भावात केली आहे. तीन ते साडेतीन हजार रुपये क्विंटलने ती विकली आहे. अशा परिस्थितीत केवळ खतासाठीच २००० रुपये आणायचे कुठून हा प्रश्न लाखो शेतकऱ्यांसमोर उभा आहे. सध्या शेतकऱ्यांना कोरोनाची नव्हे, तर खत दरवाढीची भीती निर्माण झाली आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. खत दरवाढ मागे घेण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बोरे यांनी दिला आहे. समृद्धी महामार्ग संघर्ष समितीचे अध्यक्ष नितीन पिसे पाटील, रासपचे जिल्हाध्यक्ष गजानन गारोळे, युवाशक्ती संघटनेचे अध्यक्ष, रयत क्रांती संघटनेचे चिखली तालुकाध्यक्ष रूपेश खेडेकर यांनी म्हटले आहे. सरपंचपती अनंथा बोरे, संजय राजगुरू, चेतन राजगुरू, राजेश बोरे, विकास सावळे, अरुण बोरे,नागेश बोरे, विष्णू बोरे, सागर बोरे,
विकास राजगुरू,
वैभव शेवाळे
,अरविंद सवडतकर,
प्रशांत सपकाळ
,प्रमोद तुरुकमाने
,ओम राजगुरू यांनीही खत दरवाढीचा निषेध केला आहे.