लोकमत न्यूज नेटवर्कडोणगाव : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मानधन स्वरुपात आर्थिक मदत देण्यात येत आहे. दरम्यान, अमरावती येथील विभागीय सहाय्यक आयुक्त मागासवर्गीय कक्षाचे संजय मुरतकर यांनी शनिवारी डोणगाव येथील सेतू सेवा केंद्राला भेट देऊन किसान सन्मान योजनेचा आढावा घेतला. तसेच सेतू केंद्र चालकांना मार्गदर्शन केले.अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या वृध्दापकाळात आरोग्यपूर्ण व आनंदी जीवन जगता यावे, यासाठी त्यांना आर्थिक मदत व्हावी या दृष्टीकोनातून केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान मानधन योजना सुरू केली आहे. याचा लाभ घेण्यासाठी शेतकºयांना आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जावून नाव नोंदणी करावी लागते. सेतू केंद्रामध्ये शेतकºयांना योग्य मार्गदर्शन व कार्ड वाटप सुरू आहे, की नाही याबाबत आढावा, घेण्यासाठी अमरावतीचे विभागीय सहाय्यक आयुक्त मागासवर्गीय कक्षाचे संजय मुरतकर यांनी डोणगाव येथील सेतू केंद्राला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्या बरोबर विभागीय आयुक्त कार्यालयाचे संतोष चव्हाण, कैलास ठाकरे हे होते. यावेळी त्यांनी नोंदणी केलेल्या शेतकºयांना प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचे त्यांच्याहस्ते कार्ड वाटप करून योजनेच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी मंडळ अधिकारी रहाटे, तलाठी शिवप्रसाद म्हस्के, संदीप परमाळे, संतोष मानवतकर, विजय खरात, सेतू संचालक अमोल ठाकरे, विवेक ठाकरे, गणेश घोगल सह शेतकरी उपस्थित होते.(वार्ताहर)
सहाय्यक आयुक्तांनी घेतला किसान सन्मान योजनेचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 4:06 PM