मोताळा : पाचगाव पाणी पुरवठा योजनेअंतर्गत मोताळा शहराला पाणीपुरवठा होताे. गत वीस वर्षांपासून ही योजना कार्यान्वित असल्यामुळे अनेक ठिकाणी समस्या निर्माण झालेल्या आहेत. या समस्येवर तोडगा काढण्याच्या अनुषंगाने आमदार संजय गायकवाड यांनी बुलडाणा येथे पाणीपुरवठा योजनेसंदर्भात बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
मोताळा शहराला धरणातून पाणीपुरवठा होताे. गत अनेक वर्षांपासून यामध्ये कोणत्याही प्रकारची दुरुस्ती केलेली नाही, अनेक ठिकाणी पाईपलाईन सुद्धा नाही. मोटर नादुरुस्त झाल्यास पाणी पुरवठ्याची सुद्धा समस्या निर्माण होते. ब्लिचिंग पावडर सुद्धा टाकण्यात येत नाही. गत दोन-तीन वर्षांपूर्वी याठिकाणी नवीन योजना तयार करावी, असा प्रस्ताव शासनदरबारी सादर करण्यात आलेला होता. परंतु स्थानिक प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे याबाबतीमध्ये काही कारवाई होऊ शकली नाही. आमदार संजय गायकवाड यांनी याबाबतीत बैठकीचे आयोजन करून ही योजना कार्यान्वित करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. याबाबतचा सर्व्हे होऊन तातडीने हा प्रश्न मार्गी लागणार आहे.
बैठकीला पाणीपुरवठा कनिष्ठ अभियंता कुलकर्णी, पाणी पुरवठा अधिकारी नगरपंचायत मोताळा मोरे, गाडेकर, अनंतराव देशमुख, गजानन मामलकर, अंजना खूपराव, सलीम ठेकेदार, प्रवीण जवरे, सचिन हिरोळे, राजेंद्र देशमुख, सुरेश खर्चे, गिरीश देशमुख, दिलीप वाघ, शेख मुक्तार, राजेश आढाव, अतिक जमादार, शकील भाई, प्रतीक भारसाकळे, तसेच आमदारांचे स्वीय सहायक ज्ञानेश्वर वाघ उपस्थित होते.