दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ३४ हजार १०६ संदिग्ध रुग्णांची तपासणी करण्यात आलेली आहे. सध्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा ११.०४ टक्के असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.२७ टक्के आहे. दुसरीकडे कोरोनाचा मृत्यूदर हा १.१९ टक्क्यावर स्थिर असल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले.
--आतापर्यंत ९२ हजार आरटीपीसीआर चाचण्या--
जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ३४ हजार, १०६ संदिग्धांचे नमुने तपासण्यासाठी घेण्यात आलेले आहेत. यामध्ये ९२ हजार ६७८ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. ३४ हजार २४० जणांची रॅपिड टेस्ट, तर ७ हजार १६९ जणांची ट्रुनॅटद्वारे तपासणी करण्यात आली आहे.
--कोरोनाची जिल्ह्यातील स्थिती--
एकूण तपासलेले नमुने- १,३४,१०६
निगेटिव्ह आलेले नमुने- १,१५,२२१
सरासरी पॉझिटिव्हिटी दर- ११.०४ टक्के
मृत्यूदर- १.१९ टक्का
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण- ९५.२७ टक्के