बुलडाणा : राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार संपूर्ण देशात दरवर्षी जानेवारी महिन्याच्या सुरुवातीस सुरक्षितता मोहीम साजरी करण्यात येते. रस्ते वाहतुकीस सुरक्षित प्रवास हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. त्या अंतर्गत प्रवाशाची सुरक्षित सेवा करणारे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ असून बुधवारला बुलडाणा आगारात या सुरक्षितता मोहिमेचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी उपस्थित कामगारांना सुरक्षेविषयी मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारत विद्यालयाचे मानसशास्त्रीय समुपदेशक दिलीप हिवाळे व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सी.एल.वानखेडे यांनी कामगारांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास विभागीय कार्यशाळेचे उपयंत्र अभियंता एम.एम.सरोदे, विभागीय लेखाकार एस.टी.चाहेल, विभागीय कार्यालयाचे सहाय्यक वाहतूक अधीक्षक चंद्रकांत झिने, एस.एस.भालेराव, लेखाशाखेचे अशोक देशमुख, व्ही.बी.देशमुख, एस.एन.दळवी, बुलडाणा आगाराचे स्वा.अ. अनिल चितारे, वरिष्ठ सहाय्यक प्रकाश इंगळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन आगार व्यवस्थापक रवींद्र खेडेकर यांचे निर्देशावरुन सहाय्यक वाहतूक अधीक्षक दीपक साळवे यांचे मार्गदर्शनाखाली बुलडाणा वाहतूक चमूचे दीपक वैद्य, एस.टी.माने, अरुण उबरहंडे, के.व्ही.कव्हळे, डी.डी.गवई, ए.एन.चौथमल, राजू आगाशे, कस्तुरे, सतीश गोंधळी, राठोड, सचिन पाठक, धवल भांबुरकर, संतोष बावस्कर, गोपाल काकडे, विशाल राऊत यांनी केले. सूत्रसंचालन एस.टी.कामगार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी केले. तर आभार अनिल चितारे यांनी मानले.
बुलडाणा आगारात रस्ते सुरक्षितता मोहीम; कामगारांना सुरक्षेविषयी मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 1:52 PM
बुलडाणा : राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार संपूर्ण देशात दरवर्षी जानेवारी महिन्याच्या सुरुवातीस सुरक्षितता मोहीम साजरी करण्यात येते. रस्ते वाहतुकीस सुरक्षित प्रवास हा अत्यंत महत्वाचा भाग आहे.
ठळक मुद्देबुलडाणा आगारात या सुरक्षितता मोहिमेचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी उपस्थित कामगारांना सुरक्षेविषयी मार्गदर्शन करण्यात आले. सूत्रसंचालन एस.टी.कामगार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी केले.